सरसकट मदत द्या; येवला तालुक्यात पाहणी दौरा
नाशिक/नगरसूल : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकर्यांचा असून, सरकारने सरसकट मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त करत दुष्काळग्रस्त शेतकर्यांना
उभारी दिली.
दरम्यान, परिसरात पिकांची परिस्थिती बिकट असल्याने निसर्गाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकर्यांनी केलेला खर्चही मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शासनाने शेतकर्यांना योग्य अशी मदत करावी, अशी मागणी शेतकर्यांनी मंत्री भुजबळ यांच्याकडे केली. मंत्री भुजबळ यांनी पाहणी केली. राजापूरसह परिसरातील पिकांची स्थिती पावसाअभावी अतिशय बिकट झाली आहे. चार्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मजुरांना हाताला कामे नाहीत, आठ ते नऊ महिने कसे काढणार, असा प्रश्न आहे. शेतकर्यांसह मजूरवर्गही संकटात सापडला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी यंदा शेतकर्यांचे संपूर्ण पीकच वाया गेल्याने आता जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे. संसाराचा गाडा कसा हाकलणार, असा प्रश्न शेतमजुरांना पडला आहे. त्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
नाशिक जिल्हा व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या येवला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, भुलेगाव, देवठाण भागात पावसाअभावी पिके करपली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. मंत्री भुजबळ यांनी दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा करताना सांगितले, की राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकर्यांचा असून, सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, असे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले. राजापूर परिसरातील शेतकर्यांनी मंत्री भुजबळ यांच्याकडे चारा छावणी, तसेच पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावेत, अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी पाटील, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, ग्राममहसूल अधिकारी सविता धिवर, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत बोरसे, मंडळाधिकारी गणेश लाडेकर, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार, किसन धनगे, शहराध्यक्ष दत्ता निकम, भागवतराव सोनवणे, मकरंद सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब गुंड, मच्छिंद्र थोरात, सचिन कळमकर, देवीदास निकम, नवनाथ काळे, भगवान ठोंबरे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Farmers have the first claim on the state exchequer: Minister Bhujbal
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…