नगरसेविका अंकिता शिंदे यांचे निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक (ओझर) विमानतळास ‘जटायू विमानतळ, नाशिक’ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महंत डॉ. भक्तिचरणजी महाराज (तिनो अनी आखाडा, राष्ट्रीय प्रवक्ता) यांना देण्यात आले असून, त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याप्रसंगी नगरसेविका अंकिता शिंदे, तेजश्री देशपांडे, भगवान पाठक, दादा आरोटे, अयोध्या यादव, शिवकुमार पांडे आणि अॅड. महेंद्र शिंदे उपस्थित होते.
नाशिकनगरी ही प्रभू श्रीराम, माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. रामायणातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांशी नाशिकचे धार्मिक व सांस्कृतिक नाते जोडलेले आहे. माता सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी युद्ध करून आपल्या प्राणांची आहुती देणारे जटायू महाराज हे त्याग, शौर्य, निष्ठा आणि धर्मरक्षणाचे प्रतीक आहेत. नाशिक जिल्ह्यातील टाकेद येथे जटायू महाराजांशी संबंधित धार्मिक स्थळ असून, जटायू महाराज आणि नाशिकच्या भूमीचे हे नाते नाशिकच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.
यापूर्वीही धार्मिक व संतपरंपरेतून नाशिकच्या ओझर विमानतळाला जटायू नाव देण्याची मागणी पुढे आलेली आहे. त्यामुळे ही मागणी केवळ नामकरणापुरती मर्यादित नसून, नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेली आहे.
सन 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशविदेशातून लाखो भाविक, साधू-संत, महंत व पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. अशा वेळी विमानतळाला जटायू विमानतळ, नाशिक हे नाव दिल्यास नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख देशभर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल.
विमानतळाच्या नावातून जटायू महाराजांचा त्याग, शौर्य आणि माता सीतेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले धर्मरक्षण यांची माहिती सर्वदूर पोहोचेल. तसेच टाकेद येथील जटायू महाराजांशी संबंधित धार्मिक स्थळाकडेही देशविदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाऊ शकते. त्यामुळे या नामकरणामुळे नाशिकच्या धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल.
नाशिक ही कुंभनगरी असून, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाशीही या भूमीचे नाते आहे. अशा समृद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नाशिकच्या विमानतळाला जटायू विमानतळ, नाशिक हे नाव देणे नाशिकच्या अस्मितेला साजेसे ठरेल. त्यामुळे 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक (ओझर) विमानतळाचे ‘जटायू विमानतळ, नाशिक’ असे अधिकृत नामकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Name Nashik Airport ‘Jatayu’
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…