नाशिक

सदोष व्यावसायिक पाणीमीटर रडारवर

60 जणांना नोटिसा, मनपाकडून तपासणी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या करसंकलन विभागाने गतवर्षी शहरातील रहिवााी पाणीमीटरची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी एक लाख 37 हजार पाणीमीटर सदोष आढळून आले होते. त्यानंतर आता करसंकलन विभागाने आपला मोर्चा व्यावसायिक नळकनेक्शनधारकांकडे वळवला आहे. त्यानुसार शहरातील तीन हजार 278 व्यावसायिक पाणीमीटर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत मीटरचे काटे बंद असल्याचे समोर येताच 60 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
शहरात एकूण दोन लाख 12 हजार नळकनेक्शनधारक आहेत; परंतु यातील 70 ते 80 टक्के पाणीमीटर खराब असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. करसंकलन विभागाकडून गेल्या एक वर्षापासून पाण्याची देयके खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन दिली जात आहेत. त्याचवेळी पाणी मीटरची तपासणी केली जात आहे. 2025-26 या वर्षात मनपाच्या सहाही विभागांतील नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, नवीन नाशिक या विभागातील एक लाख 55 हजार पाणी मीटरची तपासणी करण्यात आली. यावेळी एक लाख 37 हजार मीटर कोणत्या ना कोणत्या कारणाने सदोष असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार महापालिकेने संबंधितांना नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नोटिसा धाडल्या आहेत. करसंकलन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पुण्याच्या कॅनबेरी संस्थेला पाणी देयके वाटपाचे काम दिले असून, वर्षातून तीन वेळा देयके देण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.

व्यावसायिक पाणीमीटर बंद आहेत की चालू ते तपासले जाणार आहे. बंद मीटर असल्यास संबंधितांना मीटर बसवण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार आहेत. आतापर्यंत साठ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
– अजित निकत, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago