नाशिक

रिंगरोडविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

गौळाणे फाट्यावर बैलगाडीसह रास्ता रोको

सिडको : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. या रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या
शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 16) गौळाणे फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला.
भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या कथित अन्याय आणि अपुर्‍या मोबदल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर व शेतकरी नेते कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात परिसरातील अनेक गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बैलगाडीसह करण्यात आलेल्या या आंदोलनाने विशेष लक्ष वेधून घेतले.
शेती आणि शेतकर्‍यांच्या अस्तित्वावर घाला घालणार्‍या धोरणाविरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलकांनी पारंपरिक बैलगाडी महामार्गावर आणून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. योग्य भरपाई, पुनर्वसनाची हमी आणि पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान, शेतकर्‍यांची लेखी संमती, न्याय्य मोबदला आणि पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया सुनिश्चित होईपर्यंत रिंगरोड प्रकल्पाला विरोध सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दातीर, खांडबहाले व आंदोलक शेतकर्‍यांनी घेेतली आहे.

Farmers’ protest against the ring road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago