नाशिक

महिला डॉक्टरची 42 लाखांची फसवणूक

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली बनाव; गुन्हा दाखल

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील सोयगाव भागातील एका डॉक्टर महिलेस मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या प्रकरणात नाव अडकवल्याची भीती दाखवत ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून 42 लाखांंची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव येथील पाटीलवाडी परिसरात राहणार्‍या संबंधित महिला डॉक्टरला 9 ते 26 फेब्रुवारीदरम्यान मोबाइलवरून वारंवार संपर्क साधण्यात आला. सत्य, दिवेशकुमार पांडे, रणजीतकुमार सत्य आणि प्रेमकुमार गौतम अशी संशयितांची नावे आहे. त्यांनी स्वतःची ओळख तपास यंत्रणेतील अधिकारी अशी करून दिली. त्यांच्या बनावट सांगण्यावर विश्वास ठेवल्याने डॉक्टर महिलेला फसवणुकीला सामोरे जावे लागले.

याबाबत अधिक घटनाक्रम असा की, आरोपींनी ‘जेट एअरवेज’चे संचालक नरेश गोयल यांच्या आर्थिक घोटाळ्यात तुमचे नाव आल्याचे सांगितले. मुंबईतील कॅनरा बँकेत तुमच्या नावाने खाते उघडण्यात आले असून, त्यासोबत असलेले एटीएम कार्ड गोयल यांच्याकडे सापडल्याची बतावणी करण्यात आली. या खात्यात जमा झालेली दोन कोटी रुपयांची रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग झाली आहे. त्यातून तुम्हाला 25 लाख रुपयांचे कमिशन मिळाल्याचा खोटा आरोपही भामट्यांनी केला. याचबरोबर संशयितांनी डॉक्टर महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा बनाव करत व्हिडिओ कॉलवरून सतत नजर ठेवण्याचे नाटक केले. तसेच नातवंडांचे अपहरण करू आणि कुटुंबाला जीवे मारू, अशा धमक्या देत मानसिक दबाव टाकण्यात आला. या दहशतीमुळे घाबरलेल्या डॉक्टर महिलेने वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार करून एकूण 42 लाख रुपये संशयितांच्या खात्यावर वर्ग केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा मोबाइलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. अशा प्रकारचे फोन किंवा संदेश आल्यास घाबरू नये आणि तत्काळ सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Female doctor cheated of Rs 42 lakhs

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago