आ. दराडेंच्या उपस्थितीत येवला तहसीलमध्ये बैठक; विविध प्रश्न मार्गी
येवला : प्रतिनिधी
अडतीस गाव पाणीपुरवठा योजनेची वाढीव 30 टक्के पाणीपट्टी दरवाढ त्वरित मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा सडेतोड इशारा आमदार किशोर दराडे यांनी दिल्यानंतर अखेर प्रशासनाने ही दरवाढ मागे घेतली. येवला तहसील कार्यालयात आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा होऊन त्या सोडवण्यात यश आले.
बैठकीला माजी आमदार नरेंद्र दराडे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबासाहेब महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठा योजनेच्या 30 टक्के दरवाढीचा प्रश्न गाजला. शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी ही दरवाढ रद्द करण्याची आणि समितीच्या पारदर्शक पुनर्रचनेची मागणी केली होती.
आमदार दराडे यांनी आक्रमक भूमिका घेत दरवाढ न हटवल्यास आंदोलनाचा इशारा दिला. अखेर प्रांताधिकारी व गटविकास अधिकार्यांनी ही दरवाढ मागे घेत असल्याचे जाहीर केले. याशिवाय बैठकीत घरकुल योजना, पाणंंद रस्ते, कृषी, आरोग्य आणि शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत तातडीने पावले उचलण्याचे
निर्देश देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक रिजवान शेख, विशाल परदेशी, सुनीता लहरे, श्रावण देवरे, योगेश सोनवणे, शरद कुदळ, विजय कदम, बाळासाहेब वल्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Finally, the 30% hike in water charges has been withdrawn.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…