वन विभागाचे दुर्लक्ष? दहा ते बारा झाडे तोडल्याचा आरोप
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठमोठ्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालय परिसरातील तब्बल दहा ते बारा मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा निसर्गप्रेमी भगीरथ मराडे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला जात असताना दुसरीकडे शासकीय रुग्णालयाच्या आवारातील मोठमोठी झाडे तोडली जात असतील, तर हा प्रकार शासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेलाच हरताळ फासणारा आहे. सध्या वनविभागाच्या कारभारात महिला अधिकार्यांचे नेतृत्व असतानाही त्यांच्या अखत्यारीत परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप होत आहे. वनसंपदेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या नाकावर टिच्चून झाडे तोडली जात असताना अधिकारी नेमके काय करत होते? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णालय परिसरातील मोठी झाडे रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचार्यांना सावली तसेच स्वच्छ हवा देतात. अशा ठिकाणी जुनी व मोठी झाडे तोडण्यामागे नेमके कारण काय, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे. शासन पर्यावरण संवर्धनासाठी विविध अभियान राबवत असताना रुग्णालयाच्या आवारातच झाडांची कत्तल होत असेल आणि वनविभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर वनविभागाचा ‘पर्यावरण संरक्षणाचा’ दावा नेमका कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
Trees cut down in broad daylight at Ghoti Rural Hospital
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…