पेठला ठेकेदाराचा मनमानीपणा; 199 ऐवजी 300 रुपयांची वसुली
♦ बसस्थानकात कार्ड उपलब्ध
♦ सवलतीसाठी कार्ड बंधनकारक
♦ पेठ बसस्थानकात अधिक वसुली
♦ चुकीच्या कार्यपद्धतीवर कारवाई
दिंडोरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवास योजना राबविली जात आहे. शासनाने परिवहन महामंडळाच्या सर्व नियंत्रकांना 13 फेब्रुवारी 26 रोजी परिपत्रकाद्वारे एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) बंधनकारक केले आहे. कार्ड कुठल्याही बसस्थानकावर बनवून मिळणार आहे. सर्व सवलतधारी प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक केले आहे. हे कार्ड असेल तरच एसटी प्रवास तिकिटावर सवलत मिळणार आहे. यावरून प्रत्यक्षात योजना बंद होणार नसली, तरी त्याचा थेट लाभ प्रवाशांना होणार आहे.
हे कार्ड प्रीपेड वॉलेटसारखे काम करणार असून, 199 रुपये किंमत आहे. त्यात किमान 100 रुपयांचा बॅलन्स कायम ठेवावा लागेल. यासाठी 50 रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येणार आहे. हे कार्ड थेट आधार कार्डला जोडल्यामुळे वेगळे आधार कार्ड दाखविण्याची आवश्यक नाही. यात प्रामुख्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, व्याधिग्रस्त रुग्ण, सर्वसामान्य महिला, दिव्यांग जन, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्ती आदींचा समावेश आहे.
या कार्डमध्ये सवलतीच्या प्रकारानुसार सवलतीची टक्केवारी किलोमीटर आदी माहिती असेल. मात्र, पेठसारख्या आदिवासीबहुल भागात संबंधित एजन्सीच्या चालकाकडून 199 रुपयांऐवजी 300 रुपये वसूल केले जात आहे. याबाबत लाभार्थ्यांनी विचारणा केली असता 100 रुपये तुमच्या टॉपअपमध्ये टाकले जातील, असे सांगण्यात येते; परंतु कार्डच्या दिलेल्या पावतीवर तसा कुठेच उल्लेख नसल्याने लाभार्थी बुचकळ्यात पडले आहेत. 17 फेब्रुवारी या ठिकाणी हे कार्ड काढणे नोंदणी सुरू झाली. आतापर्यंत सुमारे 2200 कार्ड नोंदणी झाल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. या सावळा गोंधळ कारभाराबाबत लाभार्थ्यांच्या वतीने एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन काशिसागर यांच्याशी संपर्क साधला. येथील डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून सदरील चुकीच्या कारभारावर त्यांनी संबंधित व्यक्तीस ते केंद्र तत्काळ बंद करण्याच्या सूचना देत त्याचा अहवाल पाठविण्यास सांगितले.
Financial robbery in the name of a top-up of Rs. 100
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…