नाशिक

नाशकात अनोख्या मडबाथचा शेकडोंनी लुटला आनंद

पंचवटी : प्रतिनिधी
चामरलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादप्रमाणे आयोजित मडबाथचा (माती स्नानाचा) अबालवृद्धांसह हजारो लोकांनी आनंद लुटला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय, असेच येणार्‍या-जाणार्‍यांना वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते, असा हा नजारा होता.
महेशभाई शहा, चिराग शहा तसेच योग गुरुजी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 30 वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता; परंतु नंतर मात्र लोकांचा उत्साह दांडगा दिसला. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागातील आणि नाशिक महानगरातील सुमारे एक हजार लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. खरंतर हनुमान जयंतीनंतर येणार्‍या पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येते. वारुळाची माती गोळा केली जाते. आठ दिवस आधी ही माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ही लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असे नंदू देसाई यांनी सांगितले.
सकाळी 5.45 वाजेपासून हा कार्यक्रम सुरू झाला. बघता बघता लोकांचे थवेच्या थवे येथे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. पूर्वी एका पाटीत चिखल घेऊन प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या तो फासावा लागत होता. मात्र, यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता आणि त्यात चिखल होता. या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते. नंतर एक तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते.
मडबाथ घेणार्‍या मान्यवरांमध्ये सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी हरीश बैजल, डॉ. विश्वास सावरकर, नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमित घुगे, करी लिव्हचे संचालक विशाल उगले, बाळासाहेब काठे, भगवान काळे, वैभव शेटे, भाजपा मध्य मंडल अध्यक्ष वसंत उशीर, विजय पाटील, राजेंद्र सोनजे, ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे, प्रदीप पाटील, बबन ढगे, राहुल शहा, राजेंद्र निंबाळते, विजय सूर्यवंशी, अशोक वनारा, संदीप काकड, दिलीप भांडे, प्राचार्य राजेंद्र कुर्‍हाडे, सचिन हांडगे, नरेंद्र सोनवणे, मोहन देसाई, संदीप जाधव, राजेंद्र सोनजे, दत्ता गवळी, भालचंद्र बाविस्कर, सतीश शेकडे आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रुप, जल्लोष ग्रुप, पंचवटी व्यापारी ग्रुप, नाशिक इको ड्राइव्ह, चामरलेणी इको ड्राइव्ह आदी ग्रुपचे सदस्य आदींचा समावेश होता. मडबाथनंतर मिसळ पार्टीचाही सर्वांनी आनंद लुटला.

खूप छान अनुभव

नाशकात मडबाथचे आयोजन केले जाते आणि त्यासाठी मला आमंत्रित केल्याचे समजल्यानंतर त्याचा आनंद लुटण्यासाठी मी आवर्जून आलो आणि माझ्यासाठी हा सुखद धक्काच ठरला. हजारो लोकांना आमंत्रित करून इतका चांगला उपक्रम आणि त्यानंतर अल्पोपहार म्हणजे सारेकाही अभूतपूर्वच म्हणावे लागेल.
– हरीश बैजल, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी

Hundreds enjoy unique mud bath in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

7 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

13 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

19 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

24 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

39 minutes ago

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

46 minutes ago