नाशिक

कोटमगाव रोडवरील वीज उपकेंद्रात आग

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव- कोटमगाव रोडवरील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रात सोमवारी (दि. 9) दुपारी आग लागल्याची घटना घडली. उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या व वाळलेल्या गवताला आग लागून ती वेगाने पसरली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाचा अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. या अग्निशामक दलाच्या सदस्यांनी व महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तत्पर कार्यवाही करत आग आटोक्यात आणली, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित केला होता. उपकेंद्र परिसरात सुमारे 1630 सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या आगीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.
लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाच्या अग्निशमन दलाच्या सदस्यांनी व महावितरणच्या कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करून वेळीच आग विझविल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत वीज वितरण कंपनीचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली.

Fire at electricity substation on Kotamgaon Road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago