पाच लाख रुपयांचे नुकसान
सिडको : प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका बॅग उत्पादन करणार्या कंपनीला बुधवारी (दि. 24) सकाळी आग लागल्याने सुमारे पाच लाखांंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील गणेशनगर रस्त्यालगत टीडीके (इप्कॉस) कंपनीसमोर असलेल्या व्हीथ्री एंटरप्रायझेस या कंपनीत टुरिस्ट बॅग उत्पादनाचे काम केले जाते. बुधवारी सकाळच्या सुमारास कारखान्यातून अचानक धूर निघू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. काही वेळातच धुराचे मोठे लोळ आकाशात दिसू लागल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक अंकिता शिंदे, माजी नगरसेवक सलीम शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अॅड. महेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. आग आणखी पसरली असती तर शेजारील औद्योगिक आस्थापनांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आगीत कारखान्यातील काही कच्चा माल, तयार साहित्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले. पाच लाखांंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला
कारखान्यातून धूर निघाल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अल्पावधीत आग आटोक्यात आणल्याने आग शेजारील औद्योगिक युनिटमध्ये पसरण्यापासून रोखता आली. त्यामुळे संभाव्य मोठे आर्थिक नुकसान आणि गंभीर दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले.
Fire breaks out at bag company in Satpur Industrial Estate
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…