नाशिक

अनधिकृत बांधकामावर हातोडा

वीसहून अधिक बांधकामांवर कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा बुधवारी (दि. 24)अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. यात कोथमिरे लॉन्स, ड्रिम लॉन्स, गोल्डन प्रॉपर्टीज, दमदार स्क्रॅप सेंटर, चिकन व मटण दुकाने, अनधिकृत टपर्‍या तसेच 18 ते 20 शेड्सवर बुलडोझर चालवून अतिक्रमणे हटविण्यात आली. सुमारे 150 पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही मोहीम पार पडली.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक समन्वयक जीवन ठाकरे, अनिल लोहकरे, प्रवीण बागूल, विद्युत विभागाचे राजू झोळेकर, एनडीएस विभागीय पथक प्रमुख अविनाश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांसह मक्तेदाराकडील साठ कर्मचारी सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस मुख्यालयाकडून पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माचवे, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्यासह जवळपास 150 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे वडाळा शिवारातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळात शहरातील इतर भागांतही अशाच स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. यावेळी नाशिक पूर्व विभागीय अधिकारी हेमंत झुटे, नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, नगरनियोजन विभागाचे शाखा अभियंता प्रवीण थोरात, विनायक जाधव, गुणवंत वाघ आदी अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या नगरनियोजन विभागाने संबंधित व्यावसायिक व अतिक्रमणधारकांना यापूर्वी अनेक वेळा नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकामे कायम ठेवल्याने प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासून यंत्रसामग्री व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर एकामागोमाग एक अनधिकृत बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. यादरम्यान कोथमिरे लॉन्स, ड्रिम लॉन्स, गोल्डन प्रॉपर्टीज परिसरातील विविध बांधकामे, दमदार स्क्रॅप सेंटरमधील अनधिकृत शेड्स, तसेच रस्त्यालगतच्या टपर्‍या व व्यावसायिक वापरासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेड्स हटविण्यात आल्या. काहींनी साहित्य काढण्यासाठी वेळ मागितला.

Sledgehammer comes down on unauthorized construction.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago