नाशिक

भोंदू खरातला तिसर्‍या गुन्ह्यामध्ये पाच दिवस कोठडी

गर्भवतीवर अत्याचार प्रकरणी चौकशी

नाशिक : प्रतिनिधी
महिलांचे शोषण व फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याला तिसर्‍या गुन्ह्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या निर्णयामुळे प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सात महिन्यांच्या गर्भवतीवर खरातने अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात खरातची चौकशी होणार आहे.
या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश श्रीमती बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओद्वारे हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान तपास अधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करत फिर्याद न्यायालयासमोर मांडली. तसेच आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राइव्ह व लॅपटॉपमधील माहितीची सखोल तपासणी करण्यासाठी त्याची प्रत्यक्ष चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचाही आरोप करण्यात आला. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी प्रत्येक गुन्हा स्वतंत्र असल्याने त्यासाठी स्वतंत्र चौकशी गरजेची असल्याचा युक्तिवाद केला. याउलट आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवत यापूर्वीच विशेष तपास पथकाकडून सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीच्यासुनावण्यांमध्येही समान मुद्दे मांडले गेल्याने पुन्हा कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयाने तपास अधिकार्‍यांकडून घटनेच्या कालावधीबाबत माहिती घेतली असता, 2023 पासून विविध महिलांबाबत अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला विचारणा केली असता त्याने काहीही उत्तर देण्यास नकार दिला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरात याला तिसर्‍या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Five days in custody for fraudster Kharat in third case

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago