माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी
माजी मंत्री व आदिवासी नेते मधुकरराव पिचड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते असलेले मधुकरराव पिचड यांनी राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे गाजविली. अकोले मतदार संघातून सातत्याने ते निवडून येत असत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शिवाय आदिवासी विकास मंत्री म्हणून देखील त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली. त्यांनी व त्यांच्या मुलाने 2019 ला भाजपात प्रवेश केला होता.
ब्रेनस्टोक झाल्यामुळे त्यांना नाशिकमधील नाइन पर्ल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  दीड महिन्यापासून  त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा वैभव, सून, नातवंडे असा परिवार आहेे..

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

25 minutes ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

28 minutes ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

34 minutes ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

43 minutes ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

51 minutes ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

1 hour ago