मनमाड : प्रतिनिधी
मनमाड-मालेगाव महामार्गावर दहेगाव शिवारात ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत टँकरमधील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात टँकरमधील पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणावर वाहून गेले. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा हा टँकर असल्याची माहिती समोर आली आहे. मनमाडनजीक असलेल्या दहेगाव शिवारात हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले व जखमींना बाहेर काढले.
सविस्तर माहिती अशी की, मनमाड-मालेगाव महामार्गावर दहेगाव शिवारात टँकर (एमएच 41 एजी 8043) व युरियाचा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात टँकरमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाचे दोन्ही पाय यात अडकून गेले होते. स्थानिक नागरिकांनी गाडीचे पत्रे तोडून जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी त्यांना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात टँकरमधील पेट्रोल-डिझेल वाया गेले. सुरक्षेच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. मनमाड शहर परिसरात टँकरचे दोन अपघात झाले. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरचा दहेगाव शिवारात, तर भारत पेट्रोलियम कंपनीचा तांदूळवाडी शिवारात अपघात झाला.
टँकरमधून अवैध प्रवासी वाहतूक
मनमाड शहरातील भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडेन गॅस या चार कंपन्या आहेत. येथून टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा करण्यात येतो. टँकर भरल्यानंतर टँकरचालक काही पैसे मिळावे यासाठी अवैध प्रवासी वाहतूक करतात. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो. आजही तेच झाले. दोन पैसे वाचवण्यासाठी नागरिक असा अवैध प्रवास करतात, यामुळे त्यांना जीवाला मुकावे लागते.
Four injured in tanker-truck accident on Manmad-Malegaon highway
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…