नाशिक

पार्सल देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा

सिडको : प्रतिनिधी
व्यवसाय करण्याच्या बहाण्याने मुंबईतील तरुणाला नाशिकला बोलावून त्याच्याकडील एक लाख रुपये घेऊन बनावट नोटांचे पार्सल दिल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ अब्दुल रहिम शेख (वय 23, व्यवसाय चालक, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मुंबई) यांना दोन अज्ञात व्यक्तींनी व्यवसाय करण्यासाठी नाशिकला बोलावले होते. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते दिंडोरी रोडवरील गजपंथ परिसरातील यमाहा शोरूमजवळ आले. यावेळी दोन्ही संशयितांनी आरिफ यांच्याकडील एक लाख रुपये घेतले. त्यानंतर खाकी रंगाच्या चिकटपट्टीने पॅक केलेले एक पार्सल त्यांच्याकडे दिले. या पार्सलमध्ये तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पैसे घेतल्यानंतर दोन्ही संशयित मोटारसायकलवरून तेथून निघून गेले.
संशयित निघून गेल्यानंतर आरिफ यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये बनावट नोटा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन अज्ञात संशयितांचा शोध सुरू असून, पोलिस हवालदार वसावे पुढील तपास करीत आहेत.

Fraud of one lakh rupees under the pretext of delivering a parcel.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago