गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी चोरला 1 लाख 39 हजारांचा ऐवज
सिडको : प्रतिनिधी
सोनाराचे दुकान दाखवण्याच्या बहाण्याने एका 57 वर्षीय महिलेला सोबत नेऊन गर्दीचा फायदा घेत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज दोन अनोळखी महिलांनी लंपास केल्याची घटना एकमुखी दत्तमंदिराजवळ घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनाबाई भाऊसाहेब साळवे (वय 57, व्यवसाय धुणीभांडी, रा. एमएसईबी कार्यालयाजवळ, मेन रोड, आडगाव, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास साळवे या दोन अनोळखी महिलांसोबत सोनाराचे दुकान दाखवण्यासाठी सराफ बाजारात गेल्या होत्या.त्यानंतर त्या दोन्ही महिलांसह एकमुखी दत्तमंदिराजवळ आल्या. मंदिर परिसरातील गर्दीचा फायदा घेत दोन्ही महिलांनी साळवे यांच्या संमतीशिवाय त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील टॉप्स आणि रोख चार हजार रुपये
लंपास केले.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 90 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 45 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स आणि चार हजार रुपये रोख, असा एकूण एक लाख 39 हजार रुपयांचा ऐवज आहे. याशिवाय, लाल रंगाची ‘स्काय बँक’ असे इंग्रजीत नमूद असलेली सॅकही चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित महिलांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बागूल करीत आहेत.
Woman’s jewellery stolen under the pretext of showing a shop.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…