पंचवटी : वार्ताहर
बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकाने फिर्यादीस कॉलेज रोड परिसरात जुना फ्लॅट घेतल्याचे सांगून तो रिन्युएशन करून विकून टाकू, असे सांगत सुमारे 46 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रामदास हरी पवार (वय 51, शुभम सदन, पवार कॉलनी, आरटीओसमोर, पेठ रोड) यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक असलेले राजू सीताराम मानमोठे (वय 41, रा. वृंदावननगर किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) यांनी दि. 23 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2014 दरम्यान वृंदावननगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ, नाशिक यांनी फिर्यादी रामदास पवार यांना सांगितले की, मी कॉलेजरोड याठिकाणी एक जुना फ्लॅट घेतला असून, तुम्ही मला काही पैसे द्या. मी काही पैसे टाकतो. आपण त्या फ्लॅटचे रिन्युएशन करून चांगल्या किमतीत विकून टाकू. तुम्ही मला जे पैसे द्याल त्याच्या दुप्पट रक्कम तुम्हाला परत देईन, असे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन बँकिंगद्वारे 15 लाख 50 हजार रुपये घेतले. तसेच पवार यांच्याप्रमाणे इतरांनाही माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 30 लाख 50 हजार रुपये घेऊन एकूण 46 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर तपास करत आहेत.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…