नाशिक

फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात 60 लाखांची फसवणूक

मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात 85 लाखांहून अधिक रकमेपैकी केवळ अंशतः पैसे परत करून उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी अनिल रामचंद्र हरिनामे (वय 71, रा. 7, अनि-अभि सोसायटी, रामदास स्वामीनगर, टाकळी रोड, उपनगर, नाशिक) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद विश्वनाथ दोडके (रा. सृष्टी कॉम्प्लेक्स, मीरा रोड, ठाणे) याने फिर्यादी यांचे फ्लॅट क्र. 201, 502 आणि 504 हे 2018 साली एकूण 85 लाख 83 हजार रुपये किमतीस विक्रीसाठी घेतले. परंतु व्यवहारानंतर परस्परपणे हे फ्लॅट विक्री करून त्यातील 25 लाख 75 हजार रुपये फक्त परत दिले. उर्वरित 60 लाख 8 लाख रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार दि. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान महाराष्ट्र बँक, शाखा द्वारका, खरबंदा पार्क, नाशिक येथे घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरूटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करत आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago