नाशिक

ग्रामपंचायत सदस्य ते आमदार; गोकुळ गितेंचा संघर्षमय प्रवास

पंचवटी : सुनील बुनगे
राजकीय क्षेत्रात कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ जनसंपर्क, विकासकामे व सामान्यांशी असलेली नाळ याच्या जोरावर एखादी व्यक्ती यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवनिर्वाचित अपक्ष आमदार गोकुळ गिते. राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे तगडे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव करत गोकुळ गितेंनी मिळविलेला विजय ऐतिहासिक मानला जात आहे. निफाड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज थेट राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचला आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी : गिते कुटुंब मूळचे निफाड तालुक्यातील शिंगवे गावचे. गोकुळ गिते यांचे वडील बबनराव गिते शेतकरी. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. याच व्यवसायाच्या निमित्ताने गोकुळ यांचे मोठे बंधू गणेश गिते नाशिकमध्ये स्थायिक झाले व आपल्या कर्तृत्वावर त्यांनी नाशिकमध्ये प्रसिद्ध उद्योजक व मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख निर्माण केली. गोकुळ गितेंना राजकारणाचे बाळकडू त्यांचे काका दिगंबर वाळू गिते यांच्याकडून मिळाले. त्यांनी नाशिक जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवत सहकार व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
पंधरा वर्षांचे सामाजिक आणि राजकीय कार्य : गोकुळ गिते यांनी गेल्या 15 वर्षांपासून सायखेडा व गोदाकाठ परिसरात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी व आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले आहे. 2012 मध्ये त्यांनी शिंगवे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून प्रवेश केला. ज्या मातीत जन्मलो, तिचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून त्यांनी गोदाकाठ परिसरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले.
त्यांच्या याच लोकसंग्रहाची पावती म्हणून 2015 मध्ये त्यांची पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवड झाली. तिथे काम करताना त्यांनी शेतकरी, व्यापारी, हमाल व मापाडी अशा सर्व घटकांच्या अडीअडचणी सोडवल्या. त्यांच्या याच कामावर विश्वास ठेवून 2023 मध्ये मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून दिले. जून 2022 मध्ये झालेल्या शिंगवे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीतही गोकुळ गिते यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.
संकटकाळात धावून आलेले गिते बंधू : 2020 मधील कोविड महामारीच्या कठीण काळात जेव्हा गोकुळ गितेंचे मोठे बंधू गणेश गिते नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापतिपदावर कार्यरत होते, तेव्हा या दोन्ही भावांनी नाशिककरांसाठी मोठे कार्य केले. कोविडच्या दोन्ही लाटेत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे, रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना ते गरजूंना उपलब्ध करून देणे व मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवणे, अशा अनेक माध्यमांतून त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले.
विकासाच्या जोरावर सायखेडा गटाचा कायापालट : 2017 नंतर 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते; परंतु कोविड व इतर कारणांमुळे त्या चार वर्षे प्रलंबित राहिल्या. परिणामी सायखेडा जिल्हा परिषद गटाचा विकासरथ काहीसा रेंगाळला होता. मात्र, निवडणूक नसतानाही गोकुळ गिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधींंचा निधी आणला. या निधीच्या माध्यमातून त्यांनी सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, भुसे, मांजरगाव, म्हाळसाकोरे, बागलवाडी, औरंगपूर, भेंडाळी, महाजनपूर, तळवाडे, निपाणी पिंपळगाव, बेरवाडी व सोनगाव या परिसरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शिवार रस्ते, आरोग्य सुविधा, स्वागत कमान, स्मशानभूमी व समाजमंदिरांची उभारणी करून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला.

अपक्ष उमेदवारी अन् ऐतिहासिक विजय
जिल्हा परिषद गटात केलेल्या याच अफाट विकासकामांच्या जोरावर गोकुळ गिते यांनी थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. कोणतीही मोठी राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी पाठीशी नसताना, केवळ नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी त्यांच्या कामावर व प्रामाणिकपणावर विश्वास टाकला. मतदारांनी दिलेल्या भरभरून कौलामुळे सर्वसामान्य शेतकर्‍याचा मुलगा, ग्रामपंचायत सदस्य ते थेट विधान
परिषदेचा आमदार, असा विस्मयकारक प्रवास पूर्ण करू शकला. गोकुळ गिते यांचा हा विजय ’कामाचा आणि विश्वासाचा विजय’ म्हणून नाशिकच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

 

From Gram Panchayat Member to MLA: Gokul Gite’s Journey of Struggle

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

18 hours ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

18 hours ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

18 hours ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

18 hours ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

19 hours ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

19 hours ago