परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची विधिमंडळात घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचार्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. एसटी कर्मचार्यांना आता राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन करताना मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचार्यांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ’लालपरी’च्या माध्यमातून सेवा देणार्या कर्मचार्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, एसटी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून तो 53 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात आला आहे. तसेच, घरभाडे भत्त्याची मर्यादा 8-16-24 टक्क्यांवरून वाढवून 10-20-30 टक्के इतकी करण्यात आली आहे. यासोबतच वार्षिक वेतनवाढीचा दरही 2 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर नेण्यातआला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. तरीही कर्मचार्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा खर्च आवश्यक असल्याचे सांगतानाच, आगामी काळात भत्त्यांची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून एकूण 5 हजार 649 कोटी रुपये अदा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली. शासनाच्या या ऐतिहासिक आणि सकारात्मक निर्णयानंतर एसटी कर्मचार्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी येत्या 29 जून 2026 रोजी धरणे आंदोलन प्रस्तावित केले होते. मात्र, शासनाने मागण्या मान्य करत मोठा आर्थिक दिलासा दिल्याने कर्मचार्यांनी हे आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शासन आणि एसटी कर्मचार्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
Salary hike for ST employees; benefits on par with state government employees.
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…