नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये एप्रिलच्या मध्यातच उन्हाचा तडाखा तीव्र होत असून, बुधवारी (दि. 15) कमाल तापमान 38.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. उष्णतेच्या या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरची वर्दळही कमी झाल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, बुधवारी किमान तापमान 19.9 अंश सेल्सिअस होते. सकाळच्या सत्रात आर्द्रता 56 टक्के होती. मात्र, दुपारपर्यंत ती घटून 33 टक्क्यांवर आली. दिवसभर कोरडे हवामान राहिले. पावसाची कोणतीही नोंद झाली नाही. हंगामातील पावसाची एकूण नोंद 39 मिलिमीटर आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी तर उकाडा असह्य होत आहे. परिणामी नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल, तसेच पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवताना दिसत आहेत.
रामकुंडात डुंबण्याचा आनंद घेताना मुले.
शहरातील बाजारपेठा, चौक व रस्ते दुपारच्या वेळेत तुलनेने ओस पडत आहेत. सायंकाळी मात्र गर्दी वाढताना दिसते. उष्णतेमुळे शीतपेये, उसाचा रस, लिंबूपाणी, आइस्क्रीम यांची मागणी वाढली आहे. दुसरीकडे, डॉक्टरांकडून उष्माघात व निर्जलीकरणाच्या तक्रारींत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हलके, सैल व सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरणे, थेट उन्हात दीर्घकाळ राहणे टाळणे, अशा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसही तापमान उच्चच राहण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मागील पाच दिवसातले तापमान
किमान कमाल
15 एप्रिल – 19.9 38.8
14 एप्रिल- 20.0 39.3
13 एप्रिल- 19.3 38.5
12 एप्रिल- 20.6 39.5
11 एप्रिल- 19.3 38.8
heatwave-in-the-city
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…