महामार्गावर स्टेपनी चोरणारी टोळी जेरबंद

आडगाव गुन्हे शोध पथकाची कारवाई; मुद्देमाल जप्त

पंचवटी : प्रतिनिधी
महामार्गावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मालवाहू वाहनांच्या स्टेपनी चोरणार्‍या सराईत टोळीला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत चार आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहने, चोरीचे साहित्य व इतर मिळून 12 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी सिद्धेश्वर मेश्राम यांच्या बोलेरो पिकअप वाहनाची स्टेपनी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. फिर्यादीने चोरीसाठी वापरण्यात आलेल्या ग्रे रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारचे वर्णन तसेच वाहन क्रमांकातील शेवटचे 9257 हे अंक दिले होते.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथक रात्री गस्त घालत असताना 17 जुलै रोजी पहाटे 12.15 वाजण्याच्या सुमारास नाशिक-आग्रा महामार्गावरील मरिमाता मंदिराजवळ दोन संशयास्पद चारचाकी वाहने उभी असल्याचे आढळले. त्यापैकी एक वाहन एमएच 15 डीसी 9257 क्रमांकाचे असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहनांना घेराव घातला. संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रवीण कृष्णा गोसावी (26, रा. देवळाणे, ता. येवला), नितीन विश्वनाथ जाधव (33, रा. वाहेगाव, ता. चांदवड), प्रशांत विष्णू सूर्यवंशी (32, रा. वाहेगाव, ता. चांदवड) आणि अरविंद कृष्णा गोसावी (22, रा. देवळाणे, ता. येवला) यांचा समावेश आहे.
दोन्ही वाहनांची झडती घेतली असता स्टेपनी चोरीसाठी वापरण्यात येणारी विविध साधने व साहित्य आढळून आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दादासाहेब वाघ करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1) मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली.

Gang stealing spare tires on the highway nabbed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago