महाराष्ट्र

वाहनांना हाय सिक्युरिटी प्लेट आजच बसवा

उद्या होईल दंड

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत आज, 30 जून 2026 रोजी संपत आहे. उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, एचएसआरपी न बसवल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) च्या अनेक महत्त्वाच्या सेवा वाहनधारकांसाठी बंद केल्या जातील. यामध्ये वाहन हस्तांतरण (ओनारशिप ट्रान्स्फर), पत्ता बदल, कर्जाची नोंद करणे किंवा कमी करणे, वाहनाची पुनर्नोंदणी आणि परवाना नूतनीकरण या सेवांचा समावेश आहे. केवळ वाहनाच्या ’फिटनेस प्रमाणपत्राच्या’ नूतनीकरणासाठी ही अट लागू नसेल. दरम्यान, ज्या वाहनधारकांनी 30 जूनपर्यंत एचएसआरपी बसवण्यासाठी अधिकृत अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना मात्र 1 जुलैपासून सुरू होणार्‍या कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्य सरकारने महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी केली असून ’रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज’, ’रिअल इंडस्ट्रीज’ आणि ’एफ.टी.ए. एचएसआरपी सोल्युशन्स’ या तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. शासनाने एचएसआरपी साठी अधिकृत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, दुचाकींसाठी 450 रुपये, तीनचाकींसाठी 500 रुपये, तर हलकी आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये आकारले जाणार आहेत. ही ल्युमिनियमची विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट असून यात लेझर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी लॉकिंग प्रणाली असते. यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. तसेच, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही त्यांच्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

 

Get High-Security Number Plates installed on your vehicles today.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago