घे उंच भरारी..

पुष्पा गोटखिंडीकर

आमच्या घराशेजारी एक मोठा जुना वाडा आहे. त्या वाड्याची उंचच उंच भिंत आमच्या घराच्या बाल्कनीमधून दिसत असते. त्या भिंतीच्या मधल्या दोन विटा निघाल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे आणि त्या पोकळीमध्ये आता एका चिमणा-चिमणीने आपलं घरटं बांधलं आहे. रोज थोड्या थोड्या काटक्या आणून, कापूस आणून त्यांनी आपलं छान घरटं तयार केलं आहे. आता त्या घरट्यात चिमणा-चिमणीने आपल्या पिलांना जन्म दिला आहे आणि त्यांचा संसार खरोखरच बहरला आहे.

पैठणी : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव

बाल्कनीमध्ये फावल्या वेळात आराम खुर्चीत येऊन बसणं आणि त्या चिमणा -चिमणीच्या घरट्यात बघत राहणं हा माझा रोजचा विरंगुळाच झाला आहे. ते चिमणा-चिमणी आपल्या पिलांसाठी बाहेर जाऊन काहींना काही खाऊ, दाणापाणी आणतात आणि घरट्यात येऊन आपल्या पिलांना खाऊ घालतात. चिमणा-चिमणी येताच ती छोटी पिल्लं चीची आवाज करत घरट्याच्या तोंडापाशी येतात. त्यावेळेला चिमणा-चिमणी अत्यंत प्रेमाने त्यांना खाऊ घालताना पाहून, पशुपक्षी सुद्धा किती कुटुंबवत्सल असतात याचे प्रत्यंतर मला येते. चिमणा-चिमणी बाहेर पडतेवेळी जणू काही त्या पिलांना सांगतात. बाहेर येऊ नका हं. दार घट्ट लावून बसा आतमध्ये. आम्ही येतोच हं तुमच्यासाठी खाऊ घेऊन.

बंडखोरांच्या बॅनर, पोस्टवरून उद्धव ठाकरे गायब !

असा हा त्यांचा दिनक्रम बघण्यात माझा तासन्तास जातो.हळूहळू ती पिल्लंही आता मोठी होऊ लागली आहेत. एक दिवस मी बाल्कनीमध्ये बसले असताना ती दोन-तीन पिले आकाशात भूरदीशी उडून गेली आणि ते चिमणा-चिमणी आनंदाने त्यांच्याकडे पाहत राहिले. आता त्या घरट्यात फक्त चिमणा-चिमणी उरले.
हे दृश्य पाहून माझ्या छातीत एकदम धस्स झाले. माझे पिल्लू, माझं बाळ सुयश आता बारावीत आहे. सहा-आठ महिन्यांत तोही पुढील शिक्षणासाठी असाच माझ्यापासून दूर निघून जाईल, या विचाराने मी अगदी त्रस्त होऊन गेले.

शिवसेनेसाठी मुस्लीम दाम्पत्याचे तुळजाभवानीसह अजमेर दर्ग्याला साकडे

येता -जाता माझ्या गळ्यात पडणारा, कधी कधी माझ्या कुशीत विसावणारा, आज हा खाऊ कर, जेवायला हा बेत कर असं फर्मवणारा सुयश माझ्यापासून दूर जाणार या कल्पनेने माझे अंग शहारले.
क्षणार्धात त्याच्या जन्मापासूनचे सर्व क्षण माझ्या डोळ्यापुढे साकार झाले. त्याला जन्म देताना सोसलेल्या अनंत कळा, त्याचा जन्म होताच झालेला आनंद, त्याच्या बाललीलांनी गोकुळ बनलेलं आमचं घर, त्याचे दुखणं-खुपणं, त्याच्या बोटाला धरून शाळेत नेणे, त्याचे खेळ, त्याचे सवंगडी, त्याच्या आवडीनिवडी या सार्‍यामध्ये मी मला हरवून बसले होते आणि आता मोठा झालेला माझा सुयश काही महिन्यांत माझ्यापासून दूर जाणार या विचाराने मी व्यथित झाले होते.

बायो वेस्ट कचरा उघड्यावर टाकल्याने पंचवीस हजाराचा दंड 

पण मी लगेच स्वतःला सावरलं. त्या चिमणा-चिमणीप्रमाणे मीही माझ्या बाळाच्या पंखात बळ भरले आहे. वेळ येताच त्यानेही आकाशात उंच भरारी घेतलीच पाहिजे, माझ्या स्वार्थासाठी त्याचे पंख मी छाटता कामा नये. या मायापाशातून मला बाहेर पडता आले पाहिजे. त्यासाठी मी स्वतःला कशात ना कशात, चांगल्या कामात, सामाजिक कामात व्यस्त ठेवण्याचा निश्चय केला आहे. माझे कलागुण, छंद जोपासून, माझ्या मुलाची त्या चिमणा-चिमणीप्रमाणे प्रगती पाहणं, उंच आकाशाला गवसणी घालताना बघणं हाच माझा खरा आनंद असेल.
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा॥
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने॥

हे ही वाचा :

काय तो पाऊस.. काय ते धबधबे..एकदम ओक्के

अनैतिक संबंधातून प्राणघातक हल्ला

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

2 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

2 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

2 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

2 hours ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

3 hours ago