सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीत पडून मृत्यू झाला. सविता शिवाजी भोये (वय 13) असे मृत मुलीचे नाव आहे.
सविता भोये मुखेड (ता. निफाड) येथील आदिवासी आश्रमशाळेत सहावीत शिकत होती. सविताच्या घराजवळ ठक्करबाप्पा योजनेच्या विहिरीचे सुमारे चार वर्षांपासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचे बांधकाम करीत नाहीत. विहीर सविताच्या घराजवळ आहे. पाय घसरून विहिरीत पडून बुडून तिचा मृत्यू झाला. विहीर खोल असल्याने पाणबुड्यांनी तिला बाहेर काढले. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले. सविताच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
करंजाळी गावात सुमारे चार वर्षांपासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बाप्पा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे. तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्याने मुलीला जीव गमवावा लागला. यापूर्वीही अनेक वेळा गायी, बैल, जनावरे विहिरीत पडले आहेत. अधिकार्यांनी सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणार्या ठेकेदारांवर कारवाई करावी.
-शिवाजी भोये, सविताचे पालक
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…