नाशिक: प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रचार चांगलाच शिगेला पोहोचला आहे. रॅली च्या माध्यमातून प्रचार जोरदारपणे केला जात आहे. आज सिन्नरमध्ये महायुती चे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांची प्रचार रॅली सिन्नरमध्ये आमने सामने आली, त्यावेळी गोडसे यांनी शांतिगिरी महाराज यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले, शांतिगिरी महाराज यांनी त्यांना श्रीफळ दिले. सद्या नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होत आहे. त्यासाठी सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महायुती ने उमेदवारी जाहीर करण्यास मोठा उशीर केला, परिणामी या कालावधीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. काल नाशिकमध्ये मुख्यमंत्री येऊन गेले. महायुती मध्ये अजूनही सुसंवाद दिसून येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे,
पाहा व्हीडिओ
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…