संपादकीय

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात समर्पित करतात, अशाच युगपुरुषांची नोंद ते ते राष्ट्र आपल्या राष्ट्र इतिहासाच्या सोनेरी पुस्तकात सोनेरी हस्ताक्षरात लिहीत असतात. अशाच युगपुरुषांपैकी स्वामी विवेकानंद, परमहंस योगानंद व स्वामी रामानंद तीर्थ या महापुरुषांनी परदेशात जाऊन भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. याच महापुरुषांच्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सर्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होय. राष्ट्रपती असताना ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा जगाला परिचय करून दिला असे ज्ञानोपासक, तत्त्वज्ञ, प्राध्यापक, उपकुलगुरू, युनोस्कोच्या कार्यकारी मंडळावर काम केलेले, पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष, राजदूत, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, लेखक भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर संपूर्ण भारतात सन 1962 पासून ‘शिक्षक दिन’ म्हणून, तर संपूर्ण जगभर 28 फेब्रुवारी रोजी 11 देशांत युनोस्को या जागतिक संघटनेच्या अनुमतीने ‘शिक्षक दिन’ म्हणून
साजरा करतात.
दक्षिण भारतातील सर्वपल्ली हे डॉ. राधाकृष्णन यांच्या घराण्याचे मूळ गाव. 5 सप्टेंबर 1888 मध्ये त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुतानी या गावात झाला. ते वैष्णवपंथीय होते. त्यांचे संपूर्ण नाव राधाकृष्णन वीर स्वामी सर्वपल्ली व आईचे नाव सितामा असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे झाले. तिरुपती तसे व्यंकटेशाचे पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. व्यंकटेशामुळे त्यांच्यावर लहानपणीच धार्मिक संस्कार व भारतीय तत्त्वज्ञानाचा पगडा असल्याने घरचे वातावरण धार्मिक असल्याने लहान वयातच त्यांनी आध्यात्मिक विषयांची पुस्तके वाचन केली.
राधाकृष्णन यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये सन 1909 मध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. यावेळी त्यांच्या वाचनातून त्यांचे वक्तृत्व अतिशय बहरत गेले. त्यांचे वक्तृत्व अतिशय उत्तम, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना सोपा करून सांगण्याची हातोटी असल्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांत कॉलेजमध्ये गुणवंत शिक्षक म्हणून अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. मद्रास कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करत असताना  “The philosophy of Rabindranath Tagore” हे पुस्तक त्यांनी लिहिले व ते 1918 मध्ये प्रसिद्धही झाले. या पुस्तकाचे स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी वाचन केल्यानंतर त्यांची प्रशंसा केली. सन 1920 मध्ये ‘The Region of Religion of Contemporary Philosophy’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथात त्यांनी हिंदूंच्या उपनिषदांचे तत्त्वज्ञान पाश्चात्य विचारांपेक्षा कसे श्रेष्ठ आहे, हे सिद्ध केले व याच ग्रंथाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली व पुढे हेच पुस्तक जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी अभ्यासक्रमात समाविष्ट केले.
पुढे नजीकच्या काळात डॉ. राधाकृष्णन 1918 मध्ये म्हैसूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे विभागप्रमुख व विश्वविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. डॉक्टरांनी इंग्लंडमध्ये अनेक विद्यापीठांत भारतीय तत्त्वज्ञान जगाला कसे मार्गदर्शक ठरू शकते ते पटवून दिले. भारतीय तत्त्वज्ञानाची कीर्ती सातासमुद्रापलीकडे नेऊन फडकविणारा या भारतीय मातेच्या सुपुत्राचे भारतात परतल्यानंतर स्वागत करण्यात आले. पुढे त्यांना आंध्र विश्वविद्यालयातून डी.लिट. ही पदवी सन्मानाने बहाल
करण्यात आली. तेव्हापासून राधाकृष्णन हे खर्‍या अर्थाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणून जगभर ओळखले जाऊ लागले. पुढे 1931 मध्ये इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली. पुढे 1931 ते 37 या कालखंडामध्ये आंध्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. याच काळात विद्यापीठात सर्वांसाठी एकच भोजनव्यवस्था त्यांनी सुरू केली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी युनिव्हर्सिटी कमिशनची स्थापना केली व या कमिशनचे ते अध्यक्ष झाले. पुढे 1948 ते 1950 या काळात त्यांनी युनोस्कोत भारताचे प्रतिनिधित्व केले. युनोस्कोत अध्यक्षपदावरून भाषण देताना ते म्हणाले होते, ‘आपल्याला केवळ शांतता नको आहे, तर शांतता नांदावी अशी परिस्थिती निर्माण करायला हवी.’ उपराष्ट्रपती असताना त्यांनी युरोप, अमेरिका, चीन, जपान, इजिप्त आदी देशांना भेटी देऊन भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रचार केला.
असे म्हटले जाते वृक्ष वृक्षांचा परोपकाराचा धर्म पाळतात, माणसाने माणसाचा परोपकाराचा धर्म पाळावा. या परोपकारी वृत्तीप्रमाणे डॉ. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानंतरदेखील त्यांच्यातील शिक्षक सदैव जागृत होता. एक वेळेस एका विद्यार्थ्याने त्यांना पत्र लिहिले, ‘सर, आपल्या ‘खपवळरप हिळश्रेीेहिू’ हा ग्रंथ मला परीक्षेसाठी हवा आहे, तरी तो कृपया पाठवावा. परीक्षा झाल्यानंतर मी तो आपणास परत करीन. राष्ट्रपतींनी त्या गरजू विद्यार्थ्यांची नोट वाचल्यानंतर ताबडतोब आपला दीड हजार पानी ग्रंथ त्या गरजू विद्यार्थ्यास पाठवून दिला व सोबत पत्र लिहिले, बाळा, हा ग्रंथ तुला परत करण्याची गरज नाही. हाडाचा शिक्षक हा असा असतो.
सन 1962 मध्ये भारताचे राष्ट्रपती झाल्यावर सामान्य जनांना त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे खुले केले. त्या काळात राष्ट्रपतींचा पगार महिन्याला किमान दहा हजार असा होता. मात्र, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचा पगार दहा हजारांवरून 2500 वर आणला. यात त्यांनी राष्ट्राचे
हित पाहिले.

Great Philosopher: Dr. Sarvapalli Radhakrishnan

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 hours ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

3 hours ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

3 hours ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

3 hours ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

3 hours ago

कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यांचे जाळे होणार मजबूत

रस्ते विकासासाठी 17 हजार कोटींचा निधी नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रस्ते…

3 hours ago