मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. सातारा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अधिक पोलीस कोठडी वाढवून न देता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. काल त्यांना मुंबईच्या आर्थररोड कारागृहात आणण्यात आले. त्यानंतर काल न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर पोलिसांकडे सोपविण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर शाहुपुरीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबई, सातारा,कोल्हापूर, अकोला, बीड या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोल्हापूरनंतर आता त्यांचा ताबा कुणाकडे दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…