उत्तर महाराष्ट्र

गोळा बेरीज : गुंतवणूक मात्र विचारपूर्वक अन् योग्य सल्ल्याने हवी

शेअर बाजार : प्रमोद पुराणिक

इंडेक्स फंड चांगले की वाईट? या प्रश्‍नाला आज तरी योग्य उत्तर नाही. या प्रश्‍नाला उत्तर देताना प्रत्येकजण स्वत:चे हितसंबंध प्रथम बघण्याचा प्रयत्न करतो. म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकांना असे वाटते की, जास्तीत जास्त पैसा इंडेक्स फंडाकडे यावा, यामागे त्यांचा हेतू असा असतो की, त्यांचा खर्च कमी व्हावा. तसेच जर निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी करता आली नाही तर फंडाला जी टीका सहन करावी लागते. तो प्रश्‍न इंडेक्स फंडामध्ये येत नाही; कारण इंडेक्स फंडाला पॅसिव्ह फंड असे म्हटले जाते. परंतु पॅसिव्ह फंड याचा अर्थ निष्क्रिय असा नसून, फंडाच्या व्यवस्थापकाने स्वत:चे डोके गुंतवणूक कौशल्य वापरायचे नाही.
निर्देशांकात जेवढे शेअर्स असतील आणि त्यांचे स्थान जेवढे असेल तेवढीच रक्कम त्या-त्या शेअर्समध्ये गुंतवायची असे जरी केले तरीसुद्धा निर्देशांकाची कामगिरी आणि योजनेची कामगिरी यात थोडा फरक पडतोच. निर्देशांकात लाभांशाचे उत्पन्न विचारात घेतले जात नाही. मात्र, योजनेला लाभांशाचे उत्पन्न मिळते. त्याचबरोबर शेअर्स खरेदी-विक्री करताना काही खर्च करावा लागतो. लेखाला शीर्षक देताना गोळा बेरीज हा शब्द जाणूनबुजून वापरलेला आहे. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारी बाजार जेव्हा बंद झाला तेव्हा निर्देशांकातल्या तीस शेअर्सपैकी बारा शेअर्सने किती टक्के भांडवल वृद्धी याची आकडेवारी मांडलेली आहे.

संवेदनशील
निर्देशांकाने वार्षिक वाढ फक्त 9.6 टक्के दिली. त्या तुलनेने खालील बारा शेअर्सची वार्षिक वाढ विचारात घेतली तर गुंतवणूकदारांच्या असे लक्षात येईल की, इंडेक्स फंड खरेदी करणे याचा अर्थ तीस शेअर्सपैकी बारा शेअर्स चांगले ठरले असले तर उरलेल्या कामगिरी नसलेल्या अठरा शेअर्सचे ओझे वाहण्याचे काम गुंतवणूकदाराला करावे लागते. अर्थातच ही आकडेवारी विचारात घेताना शुक्रवारची आकडेवारी विचारात घेतलेली आहे.
ही आकडेवारी प्रातिनिधिक स्वरूपात आहे. कामगिरी चांगली काम करणार्‍या कंपन्या आणि वाईट कामागिरी करणार्‍या कंपन्या यामध्ये रोज फरक पडतो. कधी कधी तर फक्त चार किंवा पाच शेअर्समुळे निर्देशांक चांगली कामगिरी दाखवतो.
थोडक्यात प्रत्येक प्रश्‍नाला दोन बाजू असतात. परदेशात इंडेक्स फंड यशस्वी झाले किंवा वॉरेन बफेट इंडेक्स फंडाचे कौतुक करतो. म्हणून आपण त्यांची री ओढायची.
संवेदनशील निर्देशांकाची एक वर्षाची वाढ फक्त 9.6 टक्के असताना वरील पंधरा शेअर्सने निर्देशांकाच्या वाढीपेक्षा चांगली वाढ दिलेली आहे. मात्र, उरलेल्या पंधरा शेअर्सने निर्देशांकाला खाली खेचण्याचे महान कार्य केले. निफ्टी निर्देशांकाची वाढ 9.1 टक्के आहे आणि पुन्हा त्या निर्देशांकापैकी वरील पंधरा शेअर्समध्ये खालील चार शेअर्सची वार्षिक वाढ विचारात घेतली तर ती खालीलप्रमाणे आहे. या निर्देशांकातल्या एकतीस शेअर्समध्ये निर्देशांकाला खाली खेचण्याचे महान कार्य केले.
निर्देशांकाचा पीई रेशिओ 8.17 असून, दहा कंपन्यांचा निव्वळ नफा 321400 कोटी रुपये अपेक्षित असून, या निव्वळ नफ्यासाठी बाजाराची 2625836 रुपये मोजण्याची तयारी आहे. असा याचा अर्थ आहे. या निर्देशांकाने 21 टक्के वार्षिक वाढ दिली आहे. दोन वर्षांची वाढ 71.9 टक्के तर तीन वर्षांची वाढ 24.2 टक्के आहे. थोडक्यात ज्या गुंतवणूकदाराने मागील वर्षी या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. त्याने मुख्य निर्देशांकापेक्षा जवळजवळ तीनपट जास्त भांडवलवृद्धी मिळवली म्हणून क्षेत्रीय निर्देशांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या क्षेत्रात सरकारी मालकीच्या कंपन्या जास्त आहेत. या कंपन्यांच्या मोठ्या मालकाने या कंपन्यांचे मोठे नुकसान केले आहे.
नाशिकमध्ये भारत पेट्रोलियमच्या भारतातल्या सर्व डिलर्सचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पत्रकार म्हणून आम्ही या मेळाव्याला उपस्थित राहण्याची परवानगी मिळवली. या कंपनीचे बाजार मूल्यांकन सध्याचे आहे त्यापेक्षा आणखी खूप जास्त असायला हवे. परंतु, सरकारला ही कंपनी विकण्याची फार घाई झाली होती. कोणाला विकणार हे काय लिहिण्याची आवश्यकता आहे का? इंडियन ऑइल, ओएनजीसी, एचपीसीएल या कंपन्यांमध्ये नोकरी करून निवृत्त झालेल्या अनेक मंडळींशी बोलताना हे जाणवले की, कंपन्यांचे बाजार मूल्यांकन खूपच कमी आहे. काही कंपन्यांच्या बाबत बाजार मूल्यांकन आणि उपलब्ध मूल्यांकन यामध्ये खूप फरक आहे. सरकारने या कंपन्या योग्यवेळी योग्य भावाने विकल्या तर बाजार मूल्यांकन चांगले वाढू शकेल. ज्यांनी मागील वर्षी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्यांनी चांगली भांडवलवृद्धी मिळवली. मात्र, मागील तीन वर्षांची सरासरी भांडवलवृद्धी फक्त 8 टक्के आहे. म्हणून हे क्षेत्र सर्वांसाठी गुंतवणूक योग्य आहे किंवा राहील असे अजिबात नाही. मात्र, मागील वर्षी 1257 रुपयाला रिलायन्सने हक्काचे शेअर्स दिले. त्या वेळेस बाजारभाव नंतर खाली येईल, हक्काच्या शेअर्स विक्रीला पैसे भरण्याची गरज नाही, असा विचार करणार्‍या भागधारकांचा निर्णय चुकला, असे आज म्हणता येईल. शेवटी शेअर्स बाजाराची गुंतवणूक वाटते तेवढी सोपी नाही.

Bhagwat Udavant

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

3 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

10 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

11 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

11 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

11 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

11 hours ago