नाशिक

दिंडोरीत कंटेनरसह 71 लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांची कारवाई; वाहनचालकाला अटक

दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 71 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकाला अटक केली असून, एक संशयित फरार आहे. पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार, दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 5) पहाटे साडेबाराच्या सुमारास पेठ-नाशिक महामार्गावरील चाचडगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणार्‍या टाटा कंटेनरला (एमएच 05- एएम 1821) अडवून तपासणी केली असता, त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. या कारवाईत 51,78,400 रुपयांचा गुटखा व तंबाखू साठा तसेच अंदाजे 20 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 71 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा माल गुजरातमधूून कर बुडवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी मारुती रभाजी वाळुंज (वय 53, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) या चालकाला अटक केली आहे. गणेश सुमंता वाघोळे (रा. जुन्नर, जि. पुणे) वाहनमालक फरार आहे.
याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण भिसे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठाभाऊ बच्छाव आदींच्या पथकाने पार पाडली.

Gutkha worth Rs 71 lakh seized along with container in Dindori

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

16 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

17 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

17 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

17 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

17 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

17 hours ago