नाशिक

मेशीत एकाच रात्रीत दोन घरे फोडली

मेशी : वार्ताहर
देवळा तालुक्यातील मेशी येथे एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी झाली. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यातील एक घर दीड वर्षात तीनदा, तर दोन महिन्यांत दोन वेळा फोडण्यात चोरटे यशस्वी झाले. येथील इंदिरानगरजवळ बन्सीलाल कदम व कैलास शिरसाठ यांच्या बंद घरांचे कुलूप तोडले.
विशेष म्हणजे, कदम यांचे दीड वर्षात तीन वेळा, तर दोन महिन्यात दोन वेळा घर फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या घरफोडीतील चोरट्यांचा तपास न लागल्याने पोलिसांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त होत आहे.
कदम हे पुण्याला मुलाकडे गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेे होते. परिसरातील महिलेला सकाळी हा प्रकार लक्षात आला. याबाबत कदम यांना दूरध्वनीवरून कळविले. नागरिकांनी देवळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राऊत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. मात्र, ठसे न मिळाल्याने चोर सापडतील याची शक्यता धूसर मानली जात आहे.

Two houses were broken into in one night in Meshi.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

15 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

15 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

15 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

15 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

15 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

15 hours ago