नाशिक

चेहेडी पंपाजवळ सराईत दुचाकीचोर सोनू जाधव जाळ्यात

नाशिकरोड पोलिसांची सरप्राइज नाकाबंदी; तीन गुन्हे उघडकीस

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांच्या गर्दीचा फायदा घेऊन दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगारांवर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली आहे. चेहेडी पंपिंग, नाशिक-पुणे महामार्गावर लावलेल्या सरप्राइज नाकाबंदीदरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका सराईत दुचाकीचोराला गुन्हेशोध पथकाने मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
सोनू संजय जाधव (वय 25, रा. मारुती मंदिराजवळ, शिंदेगाव, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकींसह तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांच्या परिसरात होणारी गर्दी आणि वाहनांची चोरी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांनी शहरात ठिकठिकाणी सरप्राइज नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांनी गुन्हेशोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.
दि. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने चेहेडी पंपिंग परिसरात कडक नाकाबंदी लावली होती. सायंकाळी 5.20 वाजेच्या सुमारास सिन्नरच्या बाजूकडून एक संशयित विना नंबरप्लेटच्या स्प्लेंडर दुचाकीवरून येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. समोर पोलिसांची नाकाबंदी दिसताच त्याने नजर चुकवून सर्व्हिस रोडने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले.
पकडलेल्या तरुणाचेे नाव विचारले असता त्याने सोनू जाधव असे सांगून गाडीच्या कागदपत्रांबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, ती दुचाकी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी मानवी कौशल्याचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसी खाक्या दाखवताच संशयिताने नाशिकरोड पोलिस ठाणे व एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, अतुल चौधरी, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, नितीन भामरे तसेच पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, नाना पानसरे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख, योगेश रानडे आणि दीपक दिवटे यांच्या पथकाने केली.

Habitual two-wheeler thief Sonu Jadhav nabbed near Chehedi Pump.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

22 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

23 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

23 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

23 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

23 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

23 hours ago