नाशिक

सिंहस्थासाठी आरोग्य यंत्रणेचे कवच, 136 ठिकाणी उपचार सुविधा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारी लाखोंची गर्दी लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी उपचारासाठी मुख्य रुग्णालयांकडे धाव घेण्याऐवजी गर्दीच्या ठिकाणीच प्राथमिक व आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी साधुग्राम, घाट, पार्किंग, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, तसेच प्रमुख मार्गांवर 136 तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात येणार आहेत. पर्वणीच्या काळात 190 रुग्णवाहिका तैनात राहणार असून, आरोग्य व्यवस्थेसाठी 3,600 अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्रादेशिक संदर्भ रुग्णालय यांच्या 260 कोटींंच्या आरोग्य आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तात्पुरती रुग्णालये, दवाखाने, आयसीयू, रुग्णवाहिका, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ, रोगनियंत्रण आणि डिजिटल आरोग्य निरीक्षणाचा या आराखड्यात समावेश आहे.
पर्वणीदरम्यान 190 रुग्णवाहिका विविध आरोग्य केंद्रे, रुग्णालये, घाट, साधुग्राम, पार्किंग व प्रमुख मार्गांवर तैनात राहतील. यात अत्यावश्यक, तसेच प्राथमिक जीवनरक्षक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिकांचा समावेश असेल. याशिवाय गरजेनुसार तीन पोर्टेबल आपत्कालीन वैद्यकीय युनिट्सही तैनात करण्यात येणार आहेत. डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माते, वैद्यकीय तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचार्‍यांसह 3,600 अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. सिंहस्थापूर्वी या कर्मचार्‍यांना मोठ्या गर्दीतील रुग्ण व्यवस्थापन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Healthcare safety net for Simhastha; treatment facilities at 136 locations.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago