नाशिक

करवसुलीत घोटाळा; बडगुजरांचा पुराव्यासह आरोप

महापौरांकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून 6 लाख 27 हजारांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी महासभेत केला. विशेष म्हणजे यावेळी बडगुजर यांनी महासभेत थेट पुरावेच सादर केले. दरम्यान सदर प्रकरणाची महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गंभीर दखल घेत थेट आयसीआयसीआय बँकेच्या संबंधित कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्तीचे निर्देशही दिले.
सोमवारी (दि.20) महासभा सुरू होताच नगरसेवक बडगुजर यानी महापालिकेच्या करवसुलीत नागरी ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून सन 2018 ते 2022 दरम्यान कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला.
तत्कालीन अधिकारी राबडीया यांनी 28 जुलै 2022 रोजी पत्र देत फेब्रुवारी ते जुलै 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहक सेवा केंद्रामार्फत वसूल झालेल्या रकमेची माहिती मागवली होती. त्यावेळी 223 ई-चलने रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या रद्द करण्यात आलेल्या चलनांची एकूण रक्कम 6 लाख 27 हजार 650 रुपये इतकी होती. गंभीर बाब म्हणजे, ही ई-चलने रद्द करण्यात आली असली तरी संबंधित रक्कम प्रत्यक्षात वसूल झाल्याचे आढळून आले आहे. महापौरांच्या सूचनेनंतर मुख्यलेखापरीक्षक बळवंत गायकवाड यांनी लेखापरीक्षणातही ही त्रुटी आढळल्याची कबुली दिली. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून बँक कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर आहेर-आडके यांनी दिले. दरम्यान, एकाच विभागात हा भ्रष्टाचार झाला असताना पंचवटी सोडून इतर विभागातही अशाच प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी सभागृहात सदस्यांनी केला आहे. त्याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

दोषींना सोडून तक्रार करणार्‍यावरच कारवाई
करवसुलीच्या पावत्यांमध्ये खोडाखाड करून 6.27 लाखांची हेराफेरी झाल्याचे सिध्द झाल्यानंतर या भ्रष्टाचाराची कबुली खुद्द तत्कालिन पंचवटी विभागीय अधिकारी राबडिया यांनी लेखी पत्राद्वारे दिली. मात्र या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे सोडून राबडिया यांनाच याप्रकरणी जबाबदार धरुन त्यांच्या वेतनातून वसुलीसाठीची नोटीस दिली गेल्याची धक्कादायक बाब बडगुजर यांनी समोर आणली. यावेळी त्यांनी यातील संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली.

Tax collection scam; Badgujar’s allegations with evidence

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

7 minutes ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

13 minutes ago

माळमाथा परिसरातील पाणी योजनेचा बोजवारा

दूषित पाण्यामुळे 25 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात मालेगाव : प्रतिनिधी तालुक्यातील माळमाथा परिसरातील दहिवाळसह सुमारे…

20 minutes ago

खतांच्या अकृषक वापराला आळा बसणार

सुभाष काटकर : खत कंपन्यांचे प्रतिनिधी, घाऊक विक्रेत्यांची बैठक मालेगाव : प्रतिनिधी खतांच्या वितरणात पारदर्शकता…

27 minutes ago

शासकीय कर्मचारी आजपासून संपावर

नाशिक : प्रतिनिधी राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजनेबाबत दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. प्रशासकीय उदासीनतेचा…

36 minutes ago

लिफ्ट कोसळून महिला व तीन बालके जखमी; गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी जेलरोड परिसरातील राहुलनगर येथे एका नामांकित सोसायटीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना…

38 minutes ago