हायवे वर ती गाडी चालण्याच्या स्थितीत आहे अगर नाही, हे लक्षात येईल. तसेच, त्यात काही बिघाड झालेला असल्यास त्यावर योग्य ती दुरुस्ती करता येईल. भविष्यात सार्वजनिक वाहतूक सेवा (बस सेवा) सुरू करण्याची योजना आहे, असे कळले. अशा सुविधेमुळे सर्वसामान्यांना लांबचा प्रवास, कमी खर्चात, कमी वेळेत, व जलदगतीने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तरी अशी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
योजनेप्रमाणे, वृक्षारोपण करण्याचे असल्यास ते त्वरित करण्यात यावे, अशी मागणी काहींनी केली आहे. वृक्ष वाढीसाठी वेळ लागणार आहे. बदलते हवामान, वाढते तापमान आणि वातावरणातील अनियमितता नियंत्रित करायचे असल्यास, वृक्ष लागवड आणि वनीकरण त्यावरील ठोस उपाय आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे.
महामार्गच्या माध्यमातून शेतीमाल वाहतुकीसाठी प्रोत्साहन द्यावे. भाजीपाला, फळभाज्या, फळे विक्री होईल, तसेच शेतीवर अवलंबित उद्योगांनाही गती मिळेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल हव्या त्या बाजारात विकण्याची सुविधा मिळाल्याने दोन पैसे जास्त मिळू शकतात. बळीराजा सुखी तर राज्य सुखी. हे सुखाचे दिवस आणणे, शासनाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. परंतु, राज्यातील राजकीय सद्यस्थिती बघता, या सुचनांकडे बघायला कुणाला वेळ तरी मिळेल का, हाच मूळ मुद्दा आहे… लिहिण्यासारखे खूप आहे, परंतु शहाण्याने समजून घ्यावे…!!! (समाप्त)