नाशिक

होळी रे होळी, पुरणाची पोळी..!

शहरात उत्साहात होळी सण साजरा

नाशिक : प्रतिनिधी
परंपरेनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजर्‍या होणार्‍या होळीचा सण शहरात मोठ्या उत्साहात झाला. होळीच्या दिवशी होलिकादहन करून वाईट गोष्टींचा त्याग व चांगल्या विचारांचे स्वागत करत नव्या सुरुवातीचा संदेश देण्यात आला.
होळी रे होळी, पुरणाची पोळी असा जल्लोष करत नागरिकांनी सण साजरा केला. संध्याकाळी ठिकठिकाणी होळ्या पेटविण्यात आल्या होत्या. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला, तसेच श्रीफळाची आहुती देण्यात आली. होळीत भाजलेल्या खोबर्‍याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची पारंपरिक प्रथाही अनेक ठिकाणी पाळण्यात आली.
शहरातील विविध संस्था, संघटना, सोसायट्यांतील नागरिकांनी एकत्र येत सार्वजनिक होळी साजरी केली. यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
आज, मंगळवारी (दि. 3) धुळवड असून, काही नागरिक होळीची राख अंगाला लावून धुळवड साजरी करतात. नाशिकमध्ये परंपरेनुसार रंगपंचमीला रंगांचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणून होळीला विशेष महत्त्व असते. आनंद व एकोप्याचा संदेश देणारा हा सण उत्साहात साजरा करण्यात
आला.

Holi, Holi, the feast of Puranas..!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago