राशिभविष्य

सोमवार, ४ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल पंचमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन, शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज दुपारी १२ पर्यंत चांगला दिवस, घबाड संध्याकाळी ६.३३ नंतर आहे” आज दुपारी १२.२१ पर्यंत ‘सिद्धी’ योग आहे, त्यानंतर ‘व्यतिपात’ योग आहे.

चंद्र नक्षत्र – मघा (सकाळी ८.४४ पर्यंत) नंतर पूर्वा नक्षत्र आहे.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. भावाच्या मुलांकडून लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. जमिनीची कामे मार्गी लागतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. भावंड मदत करतील. भौतिक सुखात मात्र कमतरता येईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संवाद कौशल्य कामास येईल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य सुधारेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. विनाकारण वाद विवाद टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च कराल. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्वतःसाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. उपासना करा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सरकार दरबारी वजन वाढेल. शब्दावर नियंत्रण ठेवा. घरात किंवा शेतात कटकटी होऊ शकतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आध्यत्मिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. विरोधक पराभूत होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्यात सुधारणा होईल. मैदानी खेळात चमक दाखवाल. कुटुंबास वेळ द्याल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना मात्र काहींशी वाट बघावी लागेल. विरोधक डोके वर काढतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक प्रगतीसाठी चांगला दिवस आहे. वेळ वाया घालवू नका. शुभ कार्यात सहभागी व्हाल.

. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *