राशिभविष्य

गुरुवार, १४ जुलै २०२२.

आषाढ, कृष्ण, प्रतिपदा , दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, राशिभविष्य –

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

चंद्रनक्षत्र:- ‘उत्तराषाढा’ (संध्याकाळी ८.१८ पर्यंत) चंद्र राशी मकर

आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस, सकाळी ८.२७ पर्यंत ‘वैधृती’ योग आणि नंतर ‘विष्काम्भ’ योग आहे.

मेष:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल. मनासारखे व्यावसायिक यश मिळेल. अधिकार वाढतील.

वृषभ:- अकल्पित धनलाभ होऊ शकतो. येणी वसूल होतील. आर्थिक तजवीज होईल. वारसा हक्काने लाभ होतील.

मिथुन:- आज आरोग्य सांभाळा. दगदग सहन होणार नाही. प्रवासात काळजी घ्या. येणी वसूल होतील.

कर्क:- हितशत्रू उघड होतील. विनाकारण वाद टाळा. घरातील व्यक्तींना विश्वासात घ्या.

सिंह:- विजयी घोडदौड चालू राहील. काही गूढ कोडी अचानक सुटतील. योग्य मार्ग दिसेल.

कन्या:- धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. घोळ घालू नका अन्यथा संधी हातून सुटून जातील.

तुळ:- प्रतिष्ठा वाढेल. स्वप्ने साकार होतील. मान सन्मान मिळतील. गृह कलह मात्र टाळा.

वृश्चिक:- मन:स्वास्थ्य लाभेल. बौद्धिक चमक दाखवाल. लेखनात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील.

धनु:- स्पष्ट बोलणे टाळा. अधिकाराचा गैरवापर होऊ देऊ नका. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मकर:- आत्मविश्वास वाढेल. राजकीय यश प्राप्त होईल. आर्थिक क्षेत्रात वाटचाल चांगली चालू आहे.

कुंभ:- चिंता निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. भावंडांशी मतभेद संभवतात.

मीन:- अनुकूल शनी आणि चंद्र तुम्हाला सौख्य प्रदान करतील. प्रगतीकडे वाटचाल होईल. संधी चालून येतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *