नाशिक

ओझर-पिंपळगाव महामार्गावर शिरपूर-नाशिक बसचा भीषण अपघात!

टायर फुटल्याने बस डिव्हायडरवर आदळली; ४ ते ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत, मोठी दुर्घटना टळली

दिक्षी | प्रतिनिधी

ओझर-पिंपळगाव महामार्गावरील एचएएल कंपनीसमोरील उड्डाणपुलावर शिरपूर डेपोच्या नाशिककडे जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. MH 15 JC 8331 क्रमांकाची बस टायर फुटल्याने नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गावरील काही विजेचे खांब तोडत डिव्हायडरवर आदळली. या अपघातात चार ते पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. बस डिव्हायडरवर आदळल्याने विजेच्या खांबांचेही नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताची परिस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली.

बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही. चार ते पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचा दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

Horrific accident involving a Shirpur-Nashik bus on the Ozar-Pimpalgaon highway!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago