Categories: नाशिक

पिळकोसजवळ भीषण अपघात

नवापूर तालुक्यातील दाम्पत्याचा मृत्यू

खामखेडा : वार्ताहर
कळवण तालुक्यातील पिळकोस येथील राज्य महामार्ग क्रमांक 17 वर लांडू ओहळाजवळ रविवारी (दि. 26) सकाळी मॅक्झिमो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवापूर तालुक्यातील बिलबारा येथील दिनेश करणसिंग गावित व त्यांची पत्नी कीर्ती गावित यांचा मृत्यू झाला. तर कीर्ती गावित यांची लहान बहीण गंभीर जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. भरधाव मॅक्झिमो चालकाचा तीव्र वळणावर ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. धडकेनंतर दोन्ही महिला रस्त्यालगतच्या वाहत्या ओहळात फेकल्या गेल्या, तर दिनेश गावित दूर जाऊन पडले.
अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थ व शेतकरी घटनास्थळी धावले. सामाजिक कार्यकर्त्यांनी मुसळधार पावसात ओहळात उतरून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून कळवण ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिघांना नाशिकला हलविण्यात आले; मात्र वाटेतच दिनेश व कीर्ती गावित यांचा मृत्यू झाला. कळवण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

Horrific accident near Pilkos

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago