नाशिक : प्रतिनिधी
रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या सुरक्षेची व्यापक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू आणि सीसीयूसह संपूर्ण रुग्णालयांचे अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा लेखापरीक्षण तातडीने करून घेण्यास सांगण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांत ऑडिट झाले नसलेल्या रुग्णालयांनी ते प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिदक्षता विभागात गंभीर रुग्ण, नवजात बालके आणि जीवनरक्षक उपकरणांवर उपचार घेणारे रुग्ण असतात. त्यामुळे या विभागात आग किंवा विद्युत बिघाडाची घटना घडल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने केवळ अग्निशमन यंत्रणा बसवून न थांबता संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयसीयू, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग आणि हृदयरोग अतिदक्षता विभाग यांचे स्वतंत्र अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच संपूर्ण रुग्णालय इमारतीचे अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा व लिफ्ट सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यास त्या विहित कालमर्यादेत दूर करून अनुपालन अहवाल सादर करावा लागणार आहे. खासगी रुग्णालयांनी सक्षम शासकीय किंवा खासगी अभिकरणामार्फत, तर शासकीय रुग्णालयांनी शक्यतो शासकीय अभिकरणामार्फत सुरक्षा लेखापरीक्षण करून घ्यावे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांकडून ऑडिट अहवाल संकलित करून एकत्रित अनुपालन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी याबाबत रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत.
सुरक्षेतील या बाबींची होणार तपासणी
♦ आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू आणि सीसीयूचे अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा ऑडिट.
♦ संपूर्ण रुग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल आणि लिफ्ट ऑडिट.
♦ मुख्य विद्युत वितरण पेटी, वायरिंग, ट्रान्सफॉर्मर व जनरेटरची तपासणी.
♦ फायर एक्स्टिंग्विशर, स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्मची कार्यक्षमता.
♦ आपत्कालीन निर्गमन मार्ग अडथळामुक्त आहेत की नाही, याची तपासणी.
♦ ऑक्सिजन पाइपलाइन व सिलिंडरच्या साठवणुकीची सुरक्षितता.
♦ वैध अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्राची खातरजमा.
♦ आपत्कालीन पर्यायी वीजपुरवठा यंत्रणेची तपासणी.
रुग्णांच्या स्थलांतरासाठी मॉकड्रिल
आगीची दुर्घटना किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत गंभीर आणि नवजात रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, हे मोठे आव्हान असते. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देणे आणि नियमित मॉकड्रिल घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आग लागल्यास रुग्णांना कोणत्या मार्गाने बाहेर काढायचे, अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करायचा आणि पर्यायी वीजपुरवठा कसा सुरू ठेवायचा, याची प्रत्यक्ष तयारी या मॉकड्रिलमधून करून घेण्यात येणार आहे.
आग लागल्यास रुग्णांना कोणत्या मार्गाने बाहेर काढायचे, अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करायचा आणि पर्यायी वीजपुरवठा कसा सुरू ठेवायचा, याची प्रत्यक्ष तयारी या मॉकड्रिलमधून करून घेण्यात येणार आहे.
Hospitals face a trial by fire regarding safety; fire audits ordered.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…