मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय सांगत २१ लाखांची फसवणूक

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय सांगत २१ लाखांची फसवणूक
शहापूर : साजिद शेख
भ्रष्टाचार विरोधी ब्युरोचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने फोन करून अटक करण्याची धमकी देत २१ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपीने अतिरेकी कारवाईत सहभाग असलेल्या व्यक्तीचे खाते उघडून दिल्याचा आरोप फिर्यादी यांच्यावर केला होता.
कोपरखैरणे सेक्टर ५ येथे राहणाऱ्या एका ७४ वर्षीय जेष्ठ महिला नागरिकाची फसवणूक झाली आहे. फिर्यादी या घरात एकट्याच राहत असून त्यांचे अपत्य अमेरिकेत राहतात. त्यांना पाच तारखेला सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी व्हाट्स अप वरून एक व्हिडीओ कॉल आला होता. व्हिडीओ कॉल वर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख पोलीस आयुक्त म्हणून करून देत तुमच्या आधारकार्डचा गैर वापर करून अतिरेक्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे कॅनरा बँकेत खाते उघडून दिल्याचा आरोप फोन वरील व्यक्तीने फिर्यादी यांच्यावर केला.
विशेष म्हणजे त्या बदल्यात २० लाख रुपये कमिशन तुम्हाला मिळाले असून हे सर्व कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप हि फोनवरील व्यक्तीने केला. तसेच त्यामुळे तुमच्या विरोधात सीबीआय चौकशी करत असून तुम्हाला डिजिटल अटक करण्यात येत आहे. लवकरच तुमच्या अटकेनेचे आदेश देण्यात येतील. अशी धमकी दिली.या प्रकरणी चौकशी होई पर्यंत सीबीआयच्या सरकारी खात्यात तुमच्या खात्यातील सर्व पैसे टाका असे सांगत एका बँक खात्याचा क्रमांक फिर्यादी महिलेस दिला. फिर्यादी महिलेने घाबरून खात्यावरील सर्व पैसे म्हणजेच २१ लाख २८० रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यात ऑनलाईन वळते केले. विशेष म्हणजे चौकशी झाल्यावर हे पैसे परत तुमच्या खात्यात वळते होतील असेही सांगितले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही ना त्यांचा फोन आला ना पैसे आले. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी त्यांनी कोपरखैरणे पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. त्याची दखल घेत या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा संबंधित बँक खाते धारक आणि फोन वर बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे करीत आहेत.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी आदेश दिल्या प्रमाणे पोलिसांनी संबंधित बँकेशी संपर्क करून ते खाते सील केले आहे. त्यामुळे ३ लाख रुपये रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago