नाशिक

नको वृद्धाश्रमाची छाया, हवी घरातील आपुलकीची माया

ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य बनले दीनवाणे, संध्याछाया भिवविती हृदया…

नाशिक : मुकुंद बाविस्कर
आपल्या आजी-आजोबांप्रमाणेच समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणार्‍या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने केली होती. दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणार्‍या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकार्‍यांची चर्चा केली असता असे दिसून आले की, अनेकांची मानसिक कोंडी होत आहे.
अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलाकडून अत्याचार होत असल्याची तक्रार करतात. त्यांना त्यांच्या मुलांकडून त्रास होतो अनेक जण आपल्या वृद्ध आई-वडिलांना ओझे मानतात. काही लोक त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतात.मनुष्याला सर्वात मोठी चिंता किंवा भय कशाचे वाटत असेल तर मृत्यूचे, असे म्हटले जाते. आयुष्याच्या संध्याकाळी त्याचे भय अधिक वाटू लागते. परंतु ज्येष्ठ नागरिकांची निरामय आनंदी जीवन जगावे म्हणून भारतातही ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्या घरातील, नातेवाइकांतील, परिसरातील किंवा संपर्कातील ज्येष्ठ नागरिकांना रोजचे आयुष्य जगताना आनंद मिळावा म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची आजची संख्या 13 कोटी आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील ज्येेष्ठ नागरिकांची संख्या एक कोटी 40 लाख आहे. दर्जेदार जीवनशैली, आधुनिक उपचारपद्धती, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती आदी बाबींमुळे नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होत आहे.
जगात जन्माला येणार्‍या प्रत्येकालाच वार्धक्य हे अपरिहार्य आहे. वार्धक्य हा आजार किंवा रोग नव्हे, तर तो एक परिपूर्ण आयुष्य जगण्याचा सन्मान आहे. परंतु सध्या धावपळीच्या काळात सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे सामूहिक न राहता वैयक्तिक आणि व्यक्तिकेंद्रित बनले आहे, त्यामुळे काही जण आपल्या कोशात जगत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे बनले आहे. त्यामुळे त्यांना संध्याछाया भिवविती हृदया… असे वाटू लागते.

कुटुंबात, समाजात सन्मान मिळावा…

आपले उतारवयातील आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांची धडपड सुरू असते. साहजिकच समाजाने ज्येष्ठ नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धाश्रम नको तर विरंगुळा म्हणून ठिकठिकाणी नाना-नानी पार्क व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात. ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून वैद्यकीय सेवा, प्रवास सेवा, पेन्शन सेवा आदी देण्यात येतात. परंतु यासोयी सवलतींचा फायदा थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही.

ज्येष्ठ नागरिकांनी केवळ शारीरिक तक्रारी करीत बसण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास यात उर्वरित आयुष्य सुसह्य होते. काही प्रमाणात आता ज्येष्ठांनीदेखील आपल्या दैनंदिन जीवन आणि विचारांमध्ये बदल केलेला असून, अशी जाणीव अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आता दिसून येत आहे. पूर्वी साठ वर्षे जगणे फार झाले, असे समजले जात होते. परंतु या विचारांमध्ये आता बदल होत आहे.
– मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

वयाच्या ज्येष्ठतेनुसार किरकोळ शारीरिक तक्रारींवर मात करून मानसिक समर्थता वाढविल्यास आपल्या वयाच्या कार्यक्षम व्यक्तीकडे बघून नव्याने जगण्याची उमेद जागवली तर आपले दुःख कमी होऊ शकते. ज्येष्ठ नागरिक विधायक कामात गुंतवून घेऊ शकतात. कुणी बागकामाचा छंद जोपासतात, तेव्हा मनाला एक वेगळ्या प्रकारचे समाधान लाभते. ज्येष्ठ नागरिकांनी आजारांवर मात करण्यासाठी योग्य आहार-विहार, योगासने व व्यायाम करायला हवा.
– प्रा. यशवंत पाटील, ज्येष्ठ लेखक

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago