नाशिक

इगतपुरी भूमिअभिलेखचा भोंगळ कारभार

कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; नागरिकांसह शेतकर्‍यांची दमछाक

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहरात असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांची मोठी दमछाक होत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अरुण भागडे यांनी केला आहे.
शेतकरी व नागरिकांची कामे सुलभ व्हावी म्हणून शासनाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. मात्र, या कार्यालयातील एक खिडकी योजना बंद पडलेली आहे. कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी विविध कामांचा रेट चार्ट लावलेला दिसत नाही. पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होताना दिसत असून, देवाणघेवाण करणार्‍या भूमाफिया व एजंट लोकांची कामे तातडीने होतात. अनेक वेळा बरेच कर्मचारी गैरहजर राहत असून, खुर्ची रिकामी दिसत असल्याने याबाबत विचारणा केली असता फिल्डवर किंवा मोजणी करण्यासाठी गेले असल्याचा बहाणा सर्रासपणे केला जात आहे.
रेकॉर्डसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असून, पैसे न दिल्यास रेकॉर्ड फाटलेले असल्याचा बहाणा केला जात आहे.
यामुळे गोरगरीब जनतेला विनाकारण फेर्‍या माराव्या लागत आहे. या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी न राहता नाशिक येथून जाऊन येऊन करत असल्यामुळे कर्मचारी कार्यालयीन वेळेवर हजर
राहत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
या कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता व सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे नेते भागडे यांनी दिला आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करूया!

आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला…

7 hours ago

भाकरी फिरवली

भाकरी फिरवली नाही तर ती करपते. राजकारणात भाकरी फिरवण्याला फारच महत्त्व असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…

7 hours ago

दीपोत्सवानिमित्त पूरग्रस्तांना किराणाधान्य किट वाटप

येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व येवला : प्रतिनिधी दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे…

7 hours ago

सिन्नरच्या व्यापार्‍याची फसवणूक करणारा सायबर भामटा अटकेत

सिन्नर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्‍याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्‍या…

7 hours ago

इंदोरहून एक हजार केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध

शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा सिन्नर : प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात…

7 hours ago

सिन्नरकरांवर ऐन दिवाळीत पाणीटंचाईचे संकट

भाजपाचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व…

7 hours ago