नाशिक

येवल्यात कोट्यवधींची अवैध दारू जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, एकाला अटक; आंतरराज्य टोळीचा संशय

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात येवला-कोपरगाव राज्य महामार्गावर टोल नाका परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत चोरट्या मार्गाने आणलेल्या अवैध दारूचा टँकर जप्त केला. दरम्यान, एक कोटी 21 लाख, 53 हजार रुपयांचा मुद्देमाल, तसेच दारू वाहतूक करणारा टँकर ताब्यात घेऊन टँकरचालक रतनसिंह दुल्हेसिंह देवडा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अवैध दारूची चोरटी
वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आला या तीन कप्प्यात एकूण व्हिस्की दारूचे 1100 बॉक्स असून, बाजारात वाहनासह या सर्वांची किंमत अंदाज एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार आहेे उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येवला-कोपरगाव राज्य महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर टँकर (27, 6586) अडवून चौकशी केली असता सदर टँकरमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. मोठ्या प्रमाणात मद्यसाठा
जप्त केला.
शासनाचा महसूल बुडवून परराज्यातून व्हिस्की दारू आणली जात असल्याचे आढळून आले. सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. व्ही. चव्हाण व त्यांच्या पथकाने केली. पकडलेला मुद्देमाल येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जमा केला. या अवैध व्यवसायामागे अंतराज्यीय टोळी सक्रिय आहे का, या दिशेने शोध घेतला जात आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 65 (ए) 81,83, अन्वये ही कारवाई केली. युद्धपातळीवर पुढील तपास करण्यात
येत आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

7 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

16 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

19 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

2 days ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 days ago