नाशिक

चेहेडी बुद्रुकमध्ये बिबट्याची दहशत कायम

पिंजर्‍यातील ‘गुड्डू’ कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीत हालचाली कैद

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
चेहेडी बुद्रुक येथील म्हस्के मळा परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, मंगळवारी (दि. 27) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने पिंजर्‍यात बंद असलेल्या ‘गुड्डू’ नामक कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्रा पिंजर्‍यात सुरक्षित असल्याने त्याचा जीव वाचला. बिबट्याच्या या हालचाली बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चेहेडी बुद्रुक, म्हस्के मळा आणि चाडेगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. 29 ऑगस्ट रोजी चाडेगाव परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर पोहोचलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी शिवाजीराव व श्यामराव म्हस्के यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या कुत्र्यावरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही कुत्रा पिंजर्‍यात असल्याने त्याचा जीव वाचला होता. आता पुन्हा त्याच परिसरात बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. मंगळवारी पहाटे बिबट्याने म्हस्के यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पिंजर्‍याकडे धाव घेत त्यातील ‘गुड्डू’ कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्याने आवाज केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून परिसरात पिंजरे लावण्यात येत आहेत. मात्र, पिंजर्‍यात भक्ष्यच नसेल तर बिबट्या त्याकडे आकर्षित कसा होणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
बिबट्याला पिंजर्‍यात पकडण्यासाठी शेळी किंवा अन्य योग्य भक्ष्य ठेवण्याची आवश्यकता असते.
मात्र, भक्ष्याची व्यवस्था नेमकी कोणी करायची, त्यासाठीचा खर्च कोण उचलणार आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
परिसरात बिबट्याचा वारंवार होणारा वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे वाढते प्रयत्न पाहता, वन विभागाने केवळ पिंजरे लावण्यापुरती कारवाई न करता बिबट्याला पकडण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leopard terror continues in Chehedi Budruk

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

8 minutes ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

15 minutes ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

20 minutes ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

25 minutes ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

58 minutes ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

1 hour ago