नाशिक

दस्त नोंदणी कार्यालयांची संख्या वाढवा

‘नरेडको’ची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वाढत्या दस्त नोंदणी व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर दस्त नोंदणी कार्यालयांची संख्या 7 वरून किमान 10 पर्यंत वाढवून कामकाजाची वेळ रात्री दहापर्यंत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन नरेडकोतर्फे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले. ना. बावनकुळे यांनी तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
सध्या नाशिक शहर व जिल्ह्यात एकूण 7 दस्त नोंदणी कार्यालये कार्यरत असून, वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा शहरी विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांमध्ये झालेली लक्षणीय वाढ यामुळे ही कार्यालये नागरिकांच्या गरजांसाठी अपुरी पडत आहेत. विद्यमान स्थितीत केवळ एकच कार्यालय शनिवार व रविवारी सुरू असून, त्याची वेळ सकाळी 9.45 ते सायं. 6.15 अशी आहे. तसेच दोन कार्यालये सत्र पद्धतीने (सकाळी 7.00 ते दुपारी 3.15 आणि दुपारी 1.30 ते रात्री 8.15) कार्यरत आहेत, तर उर्वरित चार कार्यालये नियमित वेळेत (9.45 ते 6.15) सुरू आहेत.
या मर्यादित सुविधांमुळे कार्यालयांवर प्रचंड ताण येत असून, नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः बाहेरगावी राहणार्‍या नागरिकांना वारंवार ये-जा करावी लागत असल्याने त्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणावर
वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर नरेडको नाशिकतर्फे निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या. त्यात दस्त नोंदणी कार्यालयाची संख्या वाढवावी, सत्र पद्धतीने चालणार्‍या कार्यालयांची संख्या 1 वरून 2 करण्यात यावी. पंचवटी विभागात एकही दस्त नोंदणी कार्यालय नाही. त्यासाठी मेरी-म्हसरूळ, आडगाव आदी भागांमध्ये वेगाने होत असलेल्या निवासी व व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने त्या परिसरात स्वतंत्र तिसरे नवीन दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यात यावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांना आदेशित केले. मंत्री महोदय यांनी नाशिककरांच्या मागणीस होकार देत संबंधित सुविधा व नवीन कार्यालयांची मागणी त्वरित पूर्ण करण्यात येईल, असे आश्वस्त केले.
या चर्चेदरम्यान नरेडको नाशिकचे नूतन अध्यक्ष शंतनू देशपांडे, मानद सचिव भाविक ठक्कर, उपाध्यक्ष मरजयान पटेल, तसेच नरेडको महाराष्ट्रचे उपाध्यक्ष जयेश ठक्कर, सहसचिव प्रशांत पाटील व अभय नेरकर, तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य रुचिता लढा, नीरज कोठारी, अश्विन आव्हाड, पवन भगूरकर, मयूर कपटे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

Increase the number of document registration offices.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

11 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

11 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

11 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

12 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

12 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

12 hours ago