राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

भारत-नेपाळचे नाते पुन्हा संस्कृतीच्या धाग्याने विणले

गंगाजलाचा कलश आणि पशुपतिनाथाचं रुद्राक्ष-चंदन; मोदी-शाह यांच्यात श्रद्धेची ‘भेट’

नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारत आणि नेपाळ यांच्यातील खोल सभ्यतागत आणि आध्यात्मिक नात्याचे प्रतीक ठरेल, अशी एक सुंदर देवाणघेवाण सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह (बालेन शाह) यांना त्रिवेणीचे पवित्र गंगाजल असलेला कलश भेट दिला, तर शाह यांनी मोदींना पशुपतिनाथ मंदिरातून आणलेले रुद्राक्ष, शाळीग्राम आणि चंदन भेट दिले. श्रद्धा, संस्कृती आणि सामायिक वारशावर आधारलेले हे नाते या भेटवस्तूंतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. याशिवाय मोदींनी शाह यांना श्रीकालहस्ती शैलीत हाताने चित्रित केलेले, नैसर्गिक रंगांनी बनवलेले कळमकारी संपूर्ण रामायण चित्रही भेट दिले, असे वृत्त आहे.
या भेटीपूर्वी शाह यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले, जिथे मोदींनी त्यांचे स्वागत केले. ज्यात व्यापार, ऊर्जा, जलसंपदा, भौतिक आणि डिजिटल संपर्क, तसेच ऑगस्टमधील नेपाळमधील विनाशकारी पुरानंतरच्या मदतीवर चर्चा झाली, आणि दोन्ही नेत्यांनी आभासी पद्धतीने अयोध्या-जनकपूर जोडणारी सरयू-कमला एक्स्प्रेस, धारचूला रस्ता पूल यांचे उद्घाटन केले, तसेच संयुक्त व्हिजन दस्तऐवज आणि अवकाश, आरोग्य, पोलीस, प्रशासन, आयुर्वेद, शहरी विकास, पशुधन आणि मत्स्यपालन यांसह किमान 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. दुपारी मोदींनी शाह यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनही आयोजित केले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट
दुपारी शाह यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यावर विचारांची देवाणघेवाण झाली. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, भारत आणि नेपाळ यांच्यातील अद्वितीय आणि बहुआयामी संबंधांचा मजबूत पाया हा आपल्या सामायिक सभ्यतागत वारशावर आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील खोल, जपलेल्या बंधांवर आधारलेला आहे. यानंतर शाह यांनी दोन दिवसांचा राजकीय दौरा संपवून काठमांडूकडे प्रस्थान केले.

 

India-Nepal ties re-woven through the thread of culture

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाडकी बहीण अधिक मजबूत होणार

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय म्हणणार्‍यांना बावनकुळेंचे उत्तर नागपूर : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेवरून…

3 minutes ago

एफडीएच्या कारवाईचा धडाका सुरूच

हॉटेल यात्री, जनता आणि फिजी फॉक्सवर कारवाई नाशिक : प्रतिनिधी शहरातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री…

10 minutes ago

कारवाईचा धडाका, मग इतकी वर्षे दुर्लक्ष का?

- अश्विनी पांडे शहरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता, भेसळयुक्त व दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन…

20 hours ago

बारा कोटींची क्लीन चिट

- गोरख काळे बारा कोटींचा हिशेब मागताना सभागृह डोक्यावर घेणारे स्थायी समितीचे सदस्य अचानक शांत…

20 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 22 ते 28 नोव्हेंबर 2026 मेष : यश मिळेल हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक…

20 hours ago

जलसंधारण चळवळीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. मानवी जीवनापासून शेती, उद्योग आणि पर्यावरणाच्या संतुलनापर्यंत प्रत्येक गोष्ट…

20 hours ago