नाशिक

एफडीएच्या कारवाईचा धडाका सुरूच

हॉटेल यात्री, जनता आणि फिजी फॉक्सवर कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांमधील अस्वच्छता, मुदतबाह्य पदार्थांचा साठा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत तीन आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले आहेत. यात सीबीएस परिसरातील हॉटेल यात्री, हॉटेल जनता आणि मखमलाबाद येथील फिजी फॉक्सचा समावेश आहे. तसेच मुंगसरे येथून 33 हजार रुपये किमतीची 110 किलो शेव जप्त करण्यात आली.
20 नोव्हेंबरला ही तपासणी करण्यात आली. हॉटेल यात्रीमध्ये अस्वच्छता, आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. हॉटेल जनतामध्ये अस्वच्छतेसह तयार अन्नपदार्थ उघड्यावर विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. तर फिजी फॉक्समध्ये अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव आणि मुदतबाह्य पदार्थांचा साठा आढळला. त्यामुळे सोमवारी (दि. 23) तिन्ही आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.दरम्यान, नाशिक तालुक्यातील मुंगसरे येथील पेरूची वाडी, गट क्रमांक 371 मधील आस्थापनातून कमी दर्जाचा असल्याचा संशय आणि लेबलवरील त्रुटींमुळे 33 हजार रुपये किमतीची 110 किलो शेव जप्त करण्यात आली. संबंधित व्यावसायिकाला सुधारणा नोटीस देऊन त्रुटी दूर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी विद्या गायकवाड, अश्विनी पाटील, ऋतुजा नवले व प्रतीक भड यांनी ही कारवाई केली.

FDA’s aggressive enforcement action continues

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाडकी बहीण अधिक मजबूत होणार

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय म्हणणार्‍यांना बावनकुळेंचे उत्तर नागपूर : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेवरून…

2 minutes ago

भारत-नेपाळचे नाते पुन्हा संस्कृतीच्या धाग्याने विणले

गंगाजलाचा कलश आणि पशुपतिनाथाचं रुद्राक्ष-चंदन; मोदी-शाह यांच्यात श्रद्धेची ‘भेट’ नवी दिल्ली : प्रतिनिधी भारत आणि…

25 minutes ago

कारवाईचा धडाका, मग इतकी वर्षे दुर्लक्ष का?

- अश्विनी पांडे शहरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता, भेसळयुक्त व दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन…

20 hours ago

बारा कोटींची क्लीन चिट

- गोरख काळे बारा कोटींचा हिशेब मागताना सभागृह डोक्यावर घेणारे स्थायी समितीचे सदस्य अचानक शांत…

20 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 22 ते 28 नोव्हेंबर 2026 मेष : यश मिळेल हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक…

20 hours ago

जलसंधारण चळवळीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. मानवी जीवनापासून शेती, उद्योग आणि पर्यावरणाच्या संतुलनापर्यंत प्रत्येक गोष्ट…

20 hours ago